वरोरा शहरातुन होणारी कोळशाची वाहतूक शिवसेनेच्या नेतृत्वात स्थानिक लोकांनी पाडली बंद...
शिवसेना स्टाईलने कोळशाची वाहतूक बंद करणार
जिल्हाप्रमुख जीवतोडे
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शहरातून मोठ्या प्रमाणात गेल्या तीन वर्षापासून कोळशाची जड वाहतूक शहराच्या मध्यभागातून केली जाते. ही वाहतूक रात्री बारा वाजता सुरू होत असून सकाळी सहा वाजेपर्यंत चालत असते. त्यामुळे लोकांची झोप उडाली आहे. स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन, मोर्चे, निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे स्थानिक लोकांनी शिवसेनेच्या पुढाकाराने मंगळवारी सकाळी कोळशाची जड वाहतूक बंद पाडली. त्यामुळे माढेळी कडे जाणारी वाहतूक सकाळपासून बंद पडली होती.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात स्थानिक लोकांनी या कोळशाची जड वाहतूक बंद पाडली. ही पहिलीच वेळ नसून मागील दोन वर्षापासून सतत स्थानिक लोकांना त्रास होत असून धुळीमुळे फुफ्फुसाचे आजार वाढले आहे. लहान मुले व वयस्क व्यक्तीची झोप उडाली आहे. अपघाताचे प्रमाण वाढले असून रोड ची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून स्थानिक लोकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यावेळी मुकेश जीवतोडे यांनी सर्व ट्रकांची बिल्टी व ट्रक संबंधित कागदपत्रे पोलिसांना तपासण्यासाठी सांगित्याने ट्रक मालकाची तारांबळ उडाली होती. पोलीस अजूनही तपासच करीत आहे. मात्र गेल्या कित्येक दिवसापासून 100 च्या वर रात्रभर चालणार्या ट्रकाकडे बिल्टी व ओव्हरलोड पाहण्याची हिम्मत पोलिसांची झाली नाही. मात्र यांना रात्रीच्या अंधारात रस्ता सुरळीत करून देण्यासाठी प्रशासन नेहमी सज्ज असते.
या सगळ्यांना कंटाळून लोकांनी हे सर्व ट्रक शिवसेना स्टाईलने बंद करण्याचा इशारा ट्रक मालकांना दिला आहे.
वेकोलि प्रशासन या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. ज्या ग्राहकाने कोळसा घेतलेला आहे त्यांना कोणता रोड दिला गेला आहे हे सुद्धा सांगायला तयार नाही. वरोरा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ऐकोना कोळसा खदानीतील ट्रक अडवले गेले आहे. आणि प्रत्येक वेळेस प्रशासन लोकांना समजावून व पोलिसांची धमकी दाखवून वाहतूक सुरू करत आली आहे. त्यामुळे या त्रासाला कंटाळून लोकांनी सर्व वाहतूक बंद पाडली होती. यानंतर ही वाहतूक सुरू राहिल्यास स्थानिक जनता कायदा हातात घेईल याची दखल पोलिसांनी व प्रशासनाने घेण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रत्येक वेळेस तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कोशाचे वाहतूक करणारे ट्रक कोणत्या रोडनी जातील यांचा प्रश्न प्रलंबितच राहिला आहे.
मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी जीवनावश्यक कायद्याच्या तरतुदीनुसार आपल्या अधिकारातील नियम वापरत ट्रक चालकांना रात्रीच्या वेळेस मर्यादित काळापुरता हा रोड खुला करून दिला होता हे विशेष.
Comments
Post a Comment