स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी वरोर्यात मनसे आक्रमक, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना- मार्डा कोळसा खाण क्षेत्रात मनसेचे आंदोलन
स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात मनसे आक्रमक,
Warora
Chetan lutade
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना- मार्डा कोळसा खाण क्षेत्रात मनसेचे आंदोलन, गेले वर्षभर शासन व लोकप्रतिनिधींना स्थानिकांच्या रोजगाराचा बाबत केला जातोय पाठपुरावा, मात्र खोदकामाची परवानगी मिळालेल्या खाजगी कंपनीने चालवली आहे मनमानी, या मनमानी विरोधात स्थानिकांच्या आंदोलनात मनसेचा पुढाकार, स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा, मनसेच्या आंदोलन स्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
-स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी चंद्रपुरात मनसे आक्रमक झाली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या एकोना- मार्डा कोळसा खाण क्षेत्रात आज मनसेने आंदोलन केले. गेले वर्षभर इथल्या प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी शासन व लोकप्रतिनिधींना पाठपुरावा केला जात आहे. मात्र खोदकामाची परवानगी मिळालेल्या खाजगी कंपनीने भूमिपुत्रांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. खाजगी कंपनीने चालवलेल्या मनमानी विरोधात मनसेने स्थानिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. मनसेच्या आंदोलन स्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
Comments
Post a Comment