कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा दूचाकी सोबत अपघात
चेतन लूतडे
वणीकडे वंधली , माढेळी मार्गे जाणाऱ्या कोळशाचा ट्रक व मोटरसायकलचा आज दुपारी अपघात झाला असून सदर अपघातात एकोना येथील निखाडे नामक एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ड्राइवर फरार झाला असल्याने गावकऱ्यांमध्ये संतापा ची लाट पसरली आहे.
मागील दोन महिन्यापासून वणी येथील कोळसा साईड वर जाणाऱ्या हजारो टन कोळशाची वाहतूक एकोना खाणीतून सुरू आहे. सदर वाहतूक वरोरा ते माढेळी मार्गे वनी येथे होत आहे.
आधीच वरोरा ते माढेळी रोड इतका खराब झाला असताना त्याच रोड वरून कोशाची अवजड वाहतूक सुरू आहेत त्यामुळे येथील सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
आज कोळसा खदान येथून निघालेली ट्रक ( क्रमांक एम. एच. ३४ ए. बी. ६७१०) एकोना गावाकडे कडे जाणाऱ्या मोटरसायकल ला धडक दिल्याने निखाडे नामक महिला गंभीररित्या जखमी झाली व तिला उपचारार्थ चंद्रपूर येथे नेण्यात आली असल्याचे कळते.
Comments
Post a Comment