मंत्री तनपुरे यांचा चंद्रपूर दौरा येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी तर्फे सुधाकर रोहनकर यांना जबाबदारी देणार.
मंत्री तनपुरे यांचा चंद्रपूर दौरा
येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी तर्फे सुधाकर रोहनकर यांना जबाबदारी देणार.
वरोरा 20/2/22
चेतन लूतडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री व संपर्कप्रमुख प्राजक्त प्रसाद तनपुरे यांची भद्रावती तालुक्यातील भटाळी या गावाला भेट दिली.सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्रातील नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन या विभागांचे विद्यमान राज्य मंत्रीपद असून चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना भटाळी गावात भेट दिली.
मंत्र्यांचे स्वागत गोंडी पथनृत्याच्या गजरात जिल्हा परिषद शाळा भटाळी येथे करण्यात आले. यावेळी गावातील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व गाडगेबाबा स्वच्छता अभियाना अंतर्गत भटाळी गावापासून स्वच्छता अभियान राबविण्यात आले असून त्याची सुरुवात मंत्री तनपुरे यांनी केली. मंत्र्यांनी स्वतः गावाचा फेरफटका मारत सरपंच यांनी केलेल्या कामाची स्तुती केली.
यावेळी सुधाकर रोहणकर सरपंच यांनी दहा आरो फिल्टरची मागणी केली असून गावाचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांनी केली. खनिज निधी अंतर्गत भटाळी गावाला दुय्यम स्थान दिले असून राष्ट्रवादीचे गाव असल्याने कधीच निधी उपलब्ध झालेला नाही. अशी खंत व्यक्त केली.
मंत्र्यांनी सुद्धा कार्यकर्त्याच्या कामाची दखल घेत येणाऱ्या कालावधीत हे आश्वासन पूर्ण करण्याचे त्यांनी सांगितले. मात्र निधी अपुरा पडू नये यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुधाकर रोहणकर यांना मोठी जबाबदारी देण्याचे त्यांनी यावेळी नमूद करताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्साह संचारला होता. यावेळी काँग्रेस मधून आलेल्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्र्यांच्या हस्ते प्रवेश करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई ऊईके,भटाळी सरपंच सुधाकर रोहणकर, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, मुन्नाज शेख, सह गावकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment