महाराष्ट्र राज्यात आणीबाणी आहे

*भाजपने केला शासनाचा निषेध*
 *महाराष्ट्र राज्यात आणीबाणी आहे काय?:हंसराज अहिर*
 वरोडा :ठेंगडीसर
         भाजपा नेत्यांचे राजकीय जीवन उध्वस्त करण्याच्या षडयंत्राचा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत पुराव्यासह पर्दाफाश केला व त्या संबधित पेनड्राईव्ह विधानसभेच्या सभापतींच्या स्वाधीन केला. मात्र या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी हे पुरावे कुठून उपलब्ध झाले याची विचारणा करणारी नोटीस त्यांना पाठविली. पोलिस प्रशासनाच्या या कृतीविरोधात भाजपने आज रविवार मार्च रोजी येथील आंबेडकर चौकात आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध करीत पोलिस प्रशासनाने पाठविलेल्या नोटीसीची होळी केली. 
          माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाची सुरूवात परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून केली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या नोटीसीची होळी करण्यात आली. यावेळी उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
          "राज्यातील सत्ता पक्षातील नेत्याच्या भष्ट्राचाराची प्रकरणे व भाजप नेत्या विरोधात कारवाई करण्यासाठी शासनाने जे षडयंत्र रचले त्याचे पुरावे दिले.हे पुरावे कुठून जमविले यासंबंधात नोटीस बजावली. निर्बुद्ध शासनाची ही कृती राज्यातील लोकशाही संपविण्याचा घाट आहे.शासनाची ही कार्यवाही १९७७ च्या आणीबाणी करून देणारी आहे.राज्य शासनाने राज्यात एक प्रकारे अघोषित आणीबाणी लावली" असल्याचा आरोप यावेळी हंसराज अहीर यांनी केला .
        हंसराज अहीर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपचे जेष्ठ नेते   बाबासाहेब भागडे, ओम मांडवकर , करण देवतळे, डॉ.भगवान गायकवाड,विलास गयनेवार, अमित आसेकर, सुरेश महाजन, राजीव दोडके, पप्पू साखरिया, गजानन राऊत, विठ्ठल लेडे, अंकुश आगलावे, मोहन रंगदळ, सुषमा कराड, सायरा शेख, ज्योतीताई किटे, छाया चव्हाण आदी भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Comments