भूमिपुत्रांसाठी मनदिप रोडे याचे बेमुदत उपोषण
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील भूमिहीन बेरोजगारांसाठी मनसे नेता मनदिपभाऊ रोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे.
एकोणा कोळसा खदान अंतर्गत महालक्ष्मी कंपनीतील स्थानिकांना नोकरी देण्याकरिता मनसे व गावकरी महिलाचे बेमुदत उपोषण जिल्हाधिकारी कार्यालया चंद्रपुर येथे सोमवार सकाळ पासून करण्यात येत आहे. मागील काही महिन्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर शहर अध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात भूमिपुत्रांच्या हक्कासाठी वरोरा येथील महालक्ष्मी कंपनीत रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन व चर्चा केली होती. मात्र या निवेदनाला कंपनीने केराची टोपली दाखवली होती.
त्यामुळे आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बेमुदत उपोषणाचे हत्यार उगारले आहे. वरोरा येथील महालक्ष्मी कंपनीत मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांना रोजगार दिला असून स्थानिकांना डावण्यात आले असल्याचा आरोप मनसे ने केला आहे. त्यामुळे या परिसरातील ज्या शेतकर्या जवळ जमीन नव्हती अशा शेतकऱ्यांचे गरीब मुले मुली यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे मार्डा एकोना परिसरातील गरीब व होतकरू तरुणांना कंपनीमध्ये सामावून घेण्याची विनंती मनसेने केली होती. मात्र ही विनंती फेटाळून लावली होती.
चंद्रपूर जिल्ह्यात असंघटित कामगार सगळ्यात जास्त असून संबंधित कार्यालय सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याचा फायदा कंपनी मालक घेत आहे.
परप्रांतीय मजूर आपल्या न्याय हक्कासाठी लढत नाही. सुरक्षितेसाठी प्रश्न उपलब्ध करत नाही. आणि मेहनत नामा सुद्धा फार कमी द्यावा लागतो. आरोग्य संबंधी कोणतीही विचारपूस हे मजदूर करत नाही. आणि अशांमध्ये अपघात झाला तर कोणीच पुढे येऊन बोलत नाही. साधी नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कंपन्या परप्रांतीयांचा भरणा करून स्थानिक पातळीवरील मजुरांना हेतुपुरस्पर डावलत आहे.
त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भुमिपुत्राच्या रोजगारांच्या हक्कासाठी आग्रह धरला असून या परिसरातील लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दर्शविला आहे.
या पहिले सुद्धा आंदोलन करणाऱ्या गरीब लोकांना पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना चूप बसवले होते. त्यामुळे आता भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला वेठीस धरले आहे.
Comments
Post a Comment