अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ


वरोरा

वरोरा:तालुक्यातील नागपूर- चंद्रपूर राज्य मार्गावरील टेमुर्डा गावाजवळील पिंपळगाव शेत शिवारात एका व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नागपूर- चंद्रपूर राज्य मार्गावरील टेमुर्डा गावाजवळील पिंपळगाव शेत शिवारातील घटना मृतक अतुल बाबुराव लांडे (वय 30) रा. टेमुर्डा  हा गेल्या दोन दिवसांपूर्वीच सासरवाडीस गेल्याची गांवात चर्चा होती. टेमुर्डा गावांनजीकच्या पिंपळगाव शेत शिवारातील हायवे नजीकच्या पुलाखाली अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांचा  मृतदेह आढळून आला. गावातील व्यक्तीचा मृतदेह डोळ्यासमोर बघून परिसरातील नागरिक हादरून गेले आहेत.

 हा घातपात असल्याचा दाट संशय गाव परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वरोरा पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरिता  उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आला असून घटनेचा पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहेत.याप्रकरणी जिल्ह्यातील गुन्हे शाखा पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात असली तरी सदरील इसमाचा घातपात की आणखीन काय ? याचा उलगडा करण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे..मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Comments