*खासदार, आमदार धानोरकर दाम्पत्याचा हस्ते प्रदूषण विरहित दुचाकी वाहन दुकानाचे उदघाटन*
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा हा प्रदूषित जिल्हा म्हणून ओळखला जातो. मोठ्या प्रमाणात उद्योग व्यवसायाच्या प्रदूषणासोबतच खासगी वाहनांमुळे देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे. याप्रसंगी जेष्ठ नेते प्रकाश भाऊ मुथा यांची विशेष उपस्थिती होती.
ते चंद्रपूर येथील पी. व्ही. एस इंटरप्रायजेस इलेक्ट्रिक वाहनांच्या दुकानाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद अहिरकर, डॉ. चेतन खुटेमाटे, प्रा. विजय बदखल, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, रामदास भिसडे, कुणाल चहारे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाले कि, मागील काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात मोठा विकास होत आहे. या वाहनांचा नागरिकांनी अधिकाधिक वापर करावा यासाठी ईव्ही धोरणाच्या माध्यमातून शासन विविध उपाययोजना करीत आहे. प्रदूषण कमी करण्यावरही भर देण्यात येत आहे. सर्वच शहरांमधून या वाहनांसाठी चांगला प्रतिसाद मिळत असून, चंद्रपूर शहरात देखील या वाहनाच्या वापर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. याप्रसंगी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.
Comments
Post a Comment