वरोडा : श्याम ठेंगडी
27/4/22
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री *शिवणीताई दाणी* यांचे बुधवार २७ एप्रिलला चंद्रपुर जिल्ह्यात आगमन होत असून वरोडा शहर व ग्रामीण भाजपाच्या वतीने *आनंदवन चौक* येथे भव्य स्वागत करण्यात येणार असून यानंतर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आनंदवन चौकात दुपारी ३.३० वाजता होणार्या या कार्यक्रमात भाजपचे नेते, माजी राज्य अर्थमंत्री व महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष *सुधीर भाऊ मुनगंटीवार* तसेच माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री
*मा. हंसराज भैया अहीर* आणि भाजपा जिल्हाध्यक्ष
*देवराव दादा भोंगळे* हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला सर्व भाजप,भाजयुवामोर्चा व महिला आघाड़ीच्या वरोडा शहर व ग्रामीण पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आवर्जून उपस्थित रहावे अशी विनंती भाजपतर्फे करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment