भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल
भद्रावती रेल्वेस्थानकावर सुपरफास्ट गाड्यांचा थांबा सुरू करावा.
भद्रावती रेल्वे स्थानकावर नागरिकांचे हाल
भद्रावती15/5/22
रवी बघेल
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे ऐतिहासिक शहर असून या स्थानकावरून नागपूर व मुंबईला जाण्यासाठी एकही रेल्वे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी जैन समाजाचे भव्य मंदिर , पुरातन गणपती मंदिर व नाग मंदिर तसेच बौद्ध लेणीसाठी प्रसिद्ध आहे. भद्रावती हे तालुक्याचे ठिकाण असून या ठिकाणी मोठे उद्योग, डब्ल्यूसीएल, व ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याने भारतातील बरेच प्रवासी या ठिकाणी येत असतात.
या स्थानकावर प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी, पार्किंग, लाईट आदी मूलभूत सुविधा नाहीत.
भद्रावतीमध्ये कोरोनापूर्वी नागपूरमार्गे दिल्लीला जाण्यासाठी दक्षिण एक्सप्रेसचा थांबा होता. पण कोरोनामध्ये थांबा बंद झाला. कोरोना संपल्यानंतरही दक्षिण एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी जनतेकडून होत आहे .
डब्ल्यूसीएल आणि ओएफसीमध्ये बिहारी कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने या लोकांना परराज्यात जाण्यासाठी खूप त्रास होतो, त्यामुळे पाटणा एक्स्, UP, DN ट्रेन थांबवण्याची मागणी होत आहे.
भद्रावती येथील प्रवासी चंद्रपूरला उतरून
भद्रावतीला बस रस्त्याने यावे लागते. त्यामुळे राजस्थान, गुजरात, दिल्ली मधून मोठ्या प्रमाणात येणारे भावीक जैन बांधवची गैरसोय होत आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाने भद्रावती शहरातील रेल्वे स्थानकावर सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा थांबा सुरु करावा अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे.
या मागणीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन यासंदर्भात पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत भद्रावती करांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment