०एक लाख रुपयांचा दंड वसूल०
भद्रावती, तालुका प्रतिनिधी:- हेल्मेट सक्तीसह वाहतुकीचे अन्या नियम मोडणाया शहरातील वाहन चालकावर कारवाई करत एकाच दिवशी एक लक्ष रुपयाचा दंड भद्रावती पोलिसांनी वसूल केला .या कारवाईमुळे शहरातील वाहनचालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. सदर कारवाई दिनांक 18 मे रोज बुधवारला भद्रावती पोलिसांनी शहरातील पेट्रोल पंप चौकात केले.
गेल्या काही महिन्यात हेलमेट न वापरल्यामुळे अपघातात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले या पार्श्वभूमीवर वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी यानी काही दिवसापूर्वी जनजागृती मोहीम राबवून दुचाकी वाहन चालकांना हेलमेट वापरण्याचे तथा अन्य वाहतुकीचे नियम पाळण्याचे आव्हान केले होते. नियम मोडणाऱ्या तथा हेल्मेट न वापरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आला होता. त्यानंतर आजही कारवाई करण्यात आली सकाळपासून सुरू केलेल्या कारवाईत दिवसभरात जवळपास दोनशे वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यात हेल्मेट न वापरणे ,गाडीवर तिबल सीट जाणे ,वाहन चालवताना लायसन्स जवळ न बाळगने, गाड्या भरदार चालविणे, अल्पवयीन मुलांकडून गाड्या चालविणे यासह वाहतुकीचे अन्य नियम मोडणायावर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईतून वाहनचालकांकडून एक लक्ष रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचे धाबे दणाणले असले तरी सर्वसामान्य नागरिकांमध्ये या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार गोपाल भारती यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा ,मस्के, बोढे यांच्यासह 25 महिला पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.
@ जिल्हा क्षेत्रात हेल्मेट न वापरल्याने अनेक अपघातातून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले हे टाळण्यासाठी पोलिस अधीक्षक यांचे आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यापुढे वाहन चालकांनी वाहन चालविताना हेल्मेट वापरावे व वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे.
@गोपाल भारती@
ठाणेदार, पोलीस स्टेशन भद्रावती.
Comments
Post a Comment