_एका दिवशी दिसणाऱ्या यशामागे अनेक महिन्यांची मेहनत असते.
खेमजई :आज दि.1 मे 2022 ला जि.प.उच्च प्राथमिक शाळा,खेमजई येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन साजरा करण्यात आला.आजचा दिवस ख-या अर्थाने स्मरणात राहणार.कारण,या वर्षीपासून जि.प.उच्च प्राथमिक शाळा,खेमजई येथे एका नव्या परंपरेला सुरूवात झाली आहे.ज्यात वर्ग 1 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविण्यात आले. वर्षभर घेण्यात आलेल्या *_एक वार - दप्तराविना शनिवार_* या सहशालेय उपक्रमातील वैयक्तिक तथा सामुहिक स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले.यात पुस्तक परिचय स्पर्धा ,कथाकधन स्पर्धा ,वादविवाद स्पर्धा,स्वच्छ मुलगा-स्वच्छ मुलगी स्पर्धा,स्वयंस्फुर्त भाषण स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा या वैयक्तिक स्पर्धांचे मेडल देऊन बक्षिस वितरण करण्यात आले.सोबतच सामुहिक उपक्रमात दैनिक परीपाठ,स्वच्छ मुलगा-स्वच्छ मुलगी,वर्ग स्वच्छता,परिसर स्वच्छता ,मी होणार व्यावसायिक अशा स्पर्धांतील गुणवंतांचा मेडल आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आला.वर्षभरात ज्या विद्यार्थीनीने उत्कृष्ट कामगीरी करून 109 स्टार मिळवले अशा _*कु.नियती शेषराव चौधरी हिला STUDENT OF THE YEAR हा सन्मान देण्यात आला.*_
सामुहिक उपक्रमात 163 स्टार मिळवत _*CLASS OF THE YEAR*_ हा सन्मान *वर्ग 5 वी (वर्गशिक्षक श्री.जांभुळे सर)* यांना मिळाला. या कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी *वर्षभर चालणारा अभिनव उपक्रम* अशा शब्दांत उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाप्रसंगी शा.व्य.स.चे अध्यक्ष मा.श्री.गुणवंत कापटे,उपाध्यक्षा सौ.माधुरी चौधरी,सदस्य श्री.कविदासजी पेटकर,सौ.लांडगे मॕडम,सौ.लताताई डाखोरे,ग्रा.पं.सरपंचा सौ.मनिषा चौधरी,उपसरपंच श्री.चंद्रहास मोरे,सचिव श्री.येंचेलवार सर,सदस्य श्री.रमेश चौधरी,श्री.भाऊराव दडमल,सौ.शितल साळवे,सौ.निब्रड मॕडम,पो.पाटिल श्री.तुराणकर सर,माजी शा.व्य.स.अध्यक्ष श्री.रविंद्र रणदिवे,सामाजिक कार्यकर्ता श्री.विलास चौधरी,अंगणवाडी कार्यकर्त्या सौ.स्वाती गायकवाड,सौ.तुराणकर मॕडम, स्वयंसेवक रोशन हजारे आणि श्री.देवेंद्र पोईनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध* असणारी _जि.प.उच्च प्राथमिक शाळा,खेमजई_ ची टिम,मुख्याध्यापक श्री.बलकी सर,सौ.चेतना मून मॕडम,श्री.संजू जांभुळे सर,श्री.रवि साखरकर सर,श्री.अनिल वाघमारे सर,श्री.ईश्वर टापरे सर यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडली.
_एका दिवशी दिसणाऱ्या यशामागे अनेक महिन्यांची मेहनत असते._ हे विद्यार्थ्यांनी स्वकर्तुत्वाने दाखवून दिले.
Comments
Post a Comment