पावसाळ्यापूर्वी विद्युत वितरण कंपनी ने मेंटेनन्स चे काम पूर्ण करावी.

पावसाळ्यापूर्वी विद्युत वितरण कंपनी ने मेंटेनन्स चे काम पूर्ण करावी.

राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहन कर यांची मागणी.

फक्त बातमी
चेतन लूतडे 

भद्रावती ग्रामीण भागातील विद्युत वाहिनीच्या खाली असलेले झाडे व अर्थिंग याची नीट पाहणी करून पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनीने करून घ्यावे अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला दिली आहे.

4 मे ला भद्रावती मुख्य अभियंता विद्युत कंपणी यांना निवेदन देवुन पावसाळ्या पुर्वी भद्रावती ग्रामीण क्षेत्रातील  विद्युत तारे जवळील झाडे व अर्थिंग  तसेच देखभाल दुरुस्ती युद्ध स्थळावर कामे करण्यात यावी  ही मागणी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
मागील वर्षी विद्युत वाहिनी खालील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कंपनीला युद्ध स्थळावर देखभालीचे कामे करण्याचा इशारा दिला आहे.

 यावेळी उपकार्यकारी अभियंता लोहेये साहेब यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकरात लवकर देखभालीचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच माजरी देथील नविन विज जोडणी कार्यक्रम अंतर्गत मा. नामदार  ऊर्जा राज्य मंत्री प्रज्कता तनपुरे यांनी विहुत कंपनी ला आदेश दिले होते अपुरा निधी ए न एफ यांच्या मध्यामातुन वेळेत सुपुर्द झाल्याने ते ही काम लवकरच पूर्ण करण्याचे  आश्वासन श्री लोहे साहेब यांनी दिले.

यावेळी भद्रावती येथील चर्चेसाठी प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख ,तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर  मार्गसवार्गीय सेल चे तालुका अध्यक्ष बंडुभाऊ वनकर उपस्थित होते.

Comments