कला शाखेतील विद्यार्थिनी तालुक्यात प्रथम आल्याबद्दल मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आले.
भद्रावती :- स्थानिक विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाची कला शाखेची विद्यार्थिनी जीनत परवीन समादखां पठाण ही 82.83 टक्के गुण घेऊन भद्रावती तालुक्यात कला शाखेतून बारावीत सर्वप्रथम आली आहे. विवेकानंद महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून कला शाखेचा निकाल 89.85 टक्के लागला आहे. ती आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, प्रा. रामकृष्ण मालेकर, प्रा. भोजराज कापगते, प्रा. नरेंद्र लांबट व आपल्या आई-वडिलांना देते. तिच्या या यशाबद्दल मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आले यावेळी डॉ शकील , शाहिद कुरेशी, शेख रब्बानी, रियाज अन्वर शेख, जावेद शेख उपस्थित होते.
Comments
Post a Comment