राष्ट्र सेविका समिती उत्तम नागरिक घडविण्याचे केंद्र.
वरोरा ,चेतन लूतडे
दिनांक 2७ जून
राष्ट्र सेविका समिती तर्फे वरोरा शहरातील लोकमान्य कन्या विद्यालयात पाच दिवसाचे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत तालुक्यातील बहुसंख्य मुलींनी उपस्थिती दर्शविली. राष्ट्रसेविका संघ भारतभर कार्यरत असून स्त्री उद्धारासाठी प्रयत्नशील आहे.
वरोरा शहरातील लोकमान्य कन्या विद्यालयात पाच दिवसीय राष्ट्रसेविका समिती तर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला 108 विद्यार्थ्यीनीनी सहभाग दर्शविला असून समाजाप्रती उत्तम नागरिक होण्याचा मानस बहुतांश विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. वरोरा येथील व्यापारी महेश जाकोटिया यांनी भावनिक मत व्यक्त केले.
स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख या शिबिरात घडून येते. या निवासी शिबिरात सेविकांना योग ,व्यायाम ,शारीरिक खेळ, बौद्धिक चर्चा, कार्यशाळा आणि स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले. भारतीय संस्कृतीचे ज्ञान, देशभक्तीचे विचार देशप्रेम ,आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण ,स्वावलंबन आणि गुणसंवर्धन या गोष्टींवर शिबिरामध्ये भर दिला होता. स्त्रीच्या संस्काराची शिदोरी राष्ट्रसेविका समितीच्या शाखांमधूनच मिळत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या चंद्रपूर विभाग कार्यवाहीका, वनिता मडपूवार यांनी समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केला .
Comments
Post a Comment