वीज कोसळल्याने झाडे परिवारातील तीन व एक गजभे परिवारातील शेतकऱ्यांचे जागीच मृत्यू
वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील घटना.
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील चारगाव बू. येथून जवळच असलेल्या वायगाव भोयर येथे आज चार वाजताच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या महीलावर वीज पडून मरण पावल्याची घटना घडली..
झाडे परिवारातील शेतात कापूस नींदनीचे काम करीत असताना आज दुपारच्या सुमारास चार वाजताच्या सुमारास वायगाव येथील शेत शिवारात विजेच्या गडगडटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली यावेळी शेतात काम करीत असलेले शेतकरी एकाएकी मोसम बदलल्याने घराकडे निघत असताना पाऊस लागल्याने झाडाचा आश्रय घेत थांबले असताना चार महिलांवर अचानक विज कोसळल्याने या महिलांचा जागीच मृत्यू झाला.
यात हिरावती शालिक झाडे वय ४५ वर्ष राहणार वायगाव भोयर.माजी पंचायत समिती वरोरा सदस्य ..
पार्वता रमेश झाडे वय ६० वर्ष राहणार वायगाव ,
मधुमती सुरेश झाडे वय २० वर्ष राहणार वायगाव ,
रीना नामदेव गजभे वय वर्ष २० वर्ष राहणार वायगाव भोयर . अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर यात दोन महिला दोन मुली . याचा मृत्यू झाला असल्याने गावात तसेच परिसरात शेतकरी शेतमजूर मध्ये भीती निर्माण झाली असून गावामध्ये शोक कळा पसरली आहे.
या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पंचनामे करून आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी केली आहे ......
याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे psi श्री प्रवीण जाधव , श्री किशोर पिरके , श्री महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे ..
Comments
Post a Comment