*कोलवाँशरीच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची दैयनीय अवस्था*.
(भद्रावती):- रेल्वे स्थानकापासून चंद्रपूर नागपूर महामार्गाला जोडणारा रस्ता गुपता कोलवाँशरीजतून कोळसा घेऊन येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत असून या रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना ,विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे .याबाबत आपण खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे तक्रार करणार असून रस्त्याची उपायोजना न केल्यास या विरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा घोडपेठ येथील काँग्रेस नेते अशोक येरगुडे यांनी दिला आहे.
या रस्त्यातून वाँशरीतून रेल्वे सायडीग वर कोळसा घेऊन येणाऱ्या अवजड ट्रकांची निरंतर वाहतूक सुरू असते. या अवजड वाहनांमुळे हा रस्ता जागोजागी उखडला असून त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहे .त्यामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावर खड्ड्यासोबतच चिखलांचे साम्राज्य पसरलेले आहे .या रस्त्यातून ताडाळी रेल्वेवर जाणारे प्रवासी, वसाहतीतील नागरिक, उमरी रिठावरील ग्रामस्थ व विद्यार्थी प्रवास करीत असतात त्यामुळे त्यांना त्रास होत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे येथे अपघाताची शक्यता ही वाढली आहे. या खराब रस्त्याला कोलवाँशरीच जबाबदार असल्याचा आरोप अशोक येरगुडे यांनी केला आहे .ही समस्या आपण चंद्रपूर क्षेत्राचे खासदारांकडे नेणार असल्याचे सांगून रस्त्याची उपाययोजना न केल्यास या विरोधात जनआंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment