विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसात अंगावर वीज पळून एक शेतकरी महिला मृत्युमुखी पडल्याची घटना काल दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील जुना कोंडा गावात येथे शिवारात घडली. वर्षा ओंकार मंगाम वय ३५ रहिवासी जुना कोंडा असे मृत महिलेचे नाव आहे. वर्षा ही आपल्या पतीसह सकाळी शेतात गेली होती. शेतातील काम करित असताना दुपारी तीन ते चार दरम्यान, पती ओंकार हा खत आणण्यासाठी खत ठेवलेल्या ठिकाणी गेला होता. पण अचानक विजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली यादरम्यान वर्षा काम करीत असलेल्या या ठिकाणीच वीज कोसळल्याने वर्षाचा जागीच मृत्यू झाला. तर पती दुसऱ्या जागे असल्याने सुदेवाने वाचले. या घटनेची माहिती काढताच ग्रामस्थांनी महिलेस तत्काळ ग्रामीण रुग्णालय भद्रावती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर यांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment