आज दिनांक 9 सप्टेंबर ला नवीन सुमठाना येथील रहीवासि चंदू जी जीवने यांची सुकन्या साची जीवने Miss Teen Universe झाल्या बद्दल आम आदमी पार्टी भद्रावती तालुका आणि शहर टीम शुभेच्छा देण्यास त्यांच्या राहा त्या घरी गेली. साची जीवने या जीवने परिवार मधील सुकन्या ने संपूर्ण भारता मधे भद्रावती चे नाव लौकिक केले त्यामुळे आम आदमी पार्टी भद्रावती ने त्यांचे खुप खुप अभिनंदन केले. आम आदमी पार्टी तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल यांनी साची शी आणि साची च्या आई वडीलांशी संवाद साधतांना संपूर्ण परिवारचे खुप खुप कौतुक केले आणि उज्ज्वल भविश्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि आशीष भाऊ तांडेकर शहर उपाध्यक्ष यांनी सुद्धा शैक्षणिक मार्गदर्शन केले इतर आलेल्या सर्व पदाधिकारी यांनी सुद्धा साची ला उज्जवल भाविष्या साठी शुभेच्छा दिल्या. साची सध्या पत्रकारितेचा अभ्यास करत आहे. साची ही सामान्य कुटुंबातिल असून सुद्धा पर्वता सारखे धेय् गाठले. सोनाल पाटिल यांनी संबोधित करतांना सांगितले की आम आदमी पार्टी चे धोरण सुद्धा सामान्यात सामान्य साठी आहे. सामान्य कुटुंबात जन्म घेणाऱ्या मुला मुलींनी उच्च शिक्षित होऊन जगात नाव कमवावे ही विचारधारा आम आदमी पार्टी ची आहे. साची ला शुभेच्छा देतांना साची चे आई वडिल आम आदमी पार्टी चे तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, तालुका संघटन मंत्री चापले साहेब, शहर उपाध्यक्ष आशीष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय भाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, शहर सदस्य आदेश जी फुलझेले आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment