गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

गळफास घेऊन युवकाची आत्महत्या 

भद्रावती प्रतिनिधी
वडिलांनी फोर व्हीलर गाडी घेऊन न दिल्याने रागाच्या भरात विजासन येथे युवकाने घरीच छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनाक 9 सप्टेंबर रोजी सकाळी  उघडकीस आली 
पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास चालू आहे 
साहिल सुनील देवुळकर वय 21 वार्ष रा विंजासन असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून मृतकाचे वडील हे शेतकरी असून साहिल हा आपल्या वडिलांना फोर व्हीलर गाडी घेऊन द्या म्हणून अनेक दिवसांपासून मागे लागला परंतु वडिलांनी पीक पाणी निघाल्यावर गाडी घेवू म्हणून त्याला समजावले पण त्या कडे दुर्लक्ष करून साहिलने घरीच रात्रौ दरम्यान घरचे लोक झोपी गेल्यावर छताला गळफास लावून आत्महत्या केली सकाळी घरचे लोक उठले तेव्हा साहिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला लगेच वडिलांनी पोलीस स्टेशन भद्रावती येथे घटनेची माहिती दिली व पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा करून प्रेत शव विच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय भद्रावती पाठवलेपुढील  तपास ठाणेदार गोपाल भारती यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Comments