वरोरा 19/9/22
चेतन लूतडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी वरोरा येथे मनसे चे रमेश राजूरकर यांच्या घरी सदिच्छा भेट देऊन मनसे सैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश राजूरकर हे आगामी निवडणुकीदरम्यान मनसे तर्फे विधानसभा क्षेत्रात प्रभावी नेतृत्व ठरणार असून मनसे सैनिकाचे मनोबल वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांच्या घरी जाऊन वार्तालाप केली. यावेळी मनसे सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही भेट दिल्याने मनसेची दावेदारी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात पक्की मानली जात आहे. यावेळी राजूरकर परिवारांची विचारपूस करीत असताना पायाच्या ऑपरेशन अभावी चालणे जड झाल्याची खंत व्यक्त केली.
रमेश राजूरकर यांनी मागील विधानसभा पेक्षा यावेळेस नक्की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याचे आश्वासन राज ठाकरे यांना दिले. यावेळी मनसेचे राजू उंबरकर यांच्यासह अनेक मनसे सैनिक उपस्थित होते
Comments
Post a Comment