*एक्सलन्स अकॅडमी ऑफ सायन्स सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विदर्भ पत्रकार विकास समिती, वरोरा यांच्या वतीने नुकत्याच आयोजित एक्सलन्स अकॅडमी ऑफ सायन्स सामान्य ज्ञान स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळा, महाविद्यालयातील जवळपास ३ हजार विद्यार्थ्यांसह ज्ञान प्रेमीं, दिव्यांगांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विदर्भ पत्रकार विकास समिती, वरोरा द्वारा इयत्ता ५ ते १० वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह खुला गट व दिव्यांग विद्यार्थी गट अशा तीन गटात स्थानीक लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ विद्यालय, हिरालाल लोया विद्यालय, आनंद निकेतन महाविद्यालय, संस्कार भारती कॉन्व्हेन्ट, सेंट अॅनिस कॉन्व्हेन्ट, निजबल अंतर्गत संधी निकेतन अपंगांची कर्मशाळा, ( आनंदवन) आनंद माध्यमिक विद्यालय ( आनंदवन ) या केंद्रावर स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत वरोरा ग्रामीण व शहरी, खांबाडा, चिकणी, सुर्ला, शेगांव,आनंदवन, भद्रावती तालुक्यातील भद्रावती - डिफेन्स येथील हजारो विद्यार्थ्यांसह , ज्ञान प्रेमी, दिव्यांगांनी परिक्षेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य व बक्षीस देऊन मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष चैतन्य लुतडे, उपाध्यक्ष अनिल पाटील,सचिव राजेंद्र मर्दाने पदाधिकारी शाहीद अख्तर, प्रवीण गंधारे, सारथी ठाकुर, डॉ. प्रवीण मुधोळकर, डॉ. सागर वझे यांचे सह परीक्षक म्हणून पत्रकार शाम ठेंगडी, प्रदीप कोहपरे, विनोद शर्मा, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण सुराणा, प्रमोद काळे,सुनंदा पिजदूरकर, ममता खैरे, विद्या टोंगें, तानाजी बायस्कर, विवेक बर्वे, बाबा आगलावे, रवींद्र नलगिंटवार, प्रा. श्रीनिवास पिलगुलवार,अश्विनी आंधळकर, डॉ सतीश अगळते, अशोक बावणे, तुषार मर्दाने, अभिषेक हनवते, पियुष ढवस, प्रज्वल निकुरे, कृणाल वैद्य, प्रणय उरकांडे, शिवम रोडे, अक्षय हनवते, प्रणय खेरे, कृणाल आसूटकर, मयूर भोयर, सुमित वैरागी, आदित्य कुळमेथे, पंकज शेंडे, आदित्य चौधरी श्रुती तुमसरे,अमृता गोहोकार, पल्लवी डाहुले, मोनिका पेंदोर, जयश्री निखाडे मयुरी गाडगे, कोमल मिलमिले, आदींनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment