वडिलांनी पाजले स्वतःच्याच दोन मुलांना विष

 वडिलांनी पाजले स्वतःच्याच दोन मुलांना विष

वरोरा2/8/22
चेतन लूतडे

वरोरा तालुक्यातील बोर्डा परिसरात वडिलांनी स्वतःच्या दोन मुलाना विष पाजून हत्या करण्यात आल्याची दुःखद घटना संध्याकाळच्या सुमारास घडली.

वरोरा शहरा लगत बोर्डा या गावांमध्ये कांबळे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम काही वर्षापासून करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.

मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली. शुक्रवारी संध्याकाळी असे काही घडले दोन्ही की मुलांना सुमित संजय कांबळे 7 वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे 3वर्ष, राहत्या घरी विष देऊन वडिलांनीच हत्या करून फरार झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला . लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. 
या हत्ते मागील ठोस कारण अजून पर्यंत कळले नसून पोलीस शोध घेत आहे.  कुटुंबातील परिवारावर शोक कळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजल्यानंतर  मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे. 
या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न करीत आहे.

Comments