शिवसेनेच्या प्रयत्नामुळे फसवणूक झालेल्या महिलेला मिळाला न्याय

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे फसवणूक झालेल्या महिलेला मिळाला न्याय
* शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती

 वरोरा : तालुक्यातील चरूरखटी येथील एका महिलेकडून वरोरा येथील एका व्यक्तीने एकोना कोल माईन्स मधील तिच्या मुलाची  ऑर्डर जनरल मजूर अशी करून देण्यासाठी पाच लाख रुपये घेतल्याची तक्रार महिलेने सर्वप्रथम शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांच्याकडे केली होती. मुकेश जीवतोडे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांच्याशी संपर्क साधला आणि पोलीस तक्रार झाली. त्यानंतर झालेल्या कार्यवाहीत फसवणूक झालेल्या महिलेला न्याय मिळाला असून अशा प्रकारे प्रकल्पग्रस्तांना लुटणाऱ्या टोळीचा देखील परदाफाश होत आहे. वेकोली केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने पुढे आपण सीबीआय चौकशीची देखील मागणी करणार असल्याचे मुकेश जीवतोडे यांनी म्हटले आहे.

 वरोरा तालुक्यातील चरूरखटी येथील सुनीता महादेव बेलेकर या  करणाऱ्या ४३ वर्षीय महिलेकडे वनोजा शेत शिवारात वडिला कडून मिळालेली दोन एकर शेती होती. ती शेती सन २०२१ मध्ये माजरी एरियातील एकोणा कोल माईन्स मध्ये गेली. त्या शेतीचा १६ लाख रुपयांपेक्षा अधिकचा मोबदला तिला मिळाला. तसेच कोळसा खाणीत नोकरीची एक सीट तिच्या मुलास मिळाली. ३० जून २०२२ नुसार वेकोलीने त्यांचा मुलगा प्रफुल महादेव बेलेकर वय २४ वर्ष याचा सुरक्षा रक्षक या पदावर नियुक्तीचा आदेश वेकोलीने काढला. परंतु मुलाची आयटीआय ची परीक्षा असल्याने त्याने ऑर्डर स्वीकारला नाही. तसेच त्याला जनरल मजूर या पदावर नियुक्ती पाहिजे होती. त्यामुळे नंतर त्यांनी बंडू पंढरी नांदे यांच्या ओळखीच्या एकोना माईन्स मध्ये काम करणाऱ्या युवराज ईश्वर मोरे रा.वरोरा याच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी मुलाला जनरल मजूर म्हणून नियुक्ती हवी असल्यास तसा अर्ज वेकोलीच्या नागपूर मधील सीएमडी ऑफिस मध्ये  करण्यास सांगितले. तसेच त्यानंतर एक महिन्यात मी तुमच्या मुलाचा जनरल मजूर या पदावर नियुक्तीचा ऑर्डर काढून देतो असे सांगून त्याकरिता पाच लाख रुपये खर्च येईल असे असे सांगून युवराज मोरे याने पाच लाख रुपयांची मागणी केली. तसा विश्वास त्या महिलाला देण्यात आला तेव्हा त्या महिलेने सहमती दर्शवली आणि २७ जून २२ रोजी बंडू पंढरी नांदे व पती  महादेव साधू बेलेकर यांच्या सोबत जाऊन युवराज मोरे यांना त्यांच्या घरी जाऊन दोन लाख रुपये दिले. त्यानंतर २९ जून २०२२ , ११ जुलै २०२२ व त्यानंतर १२ जुलै २०२२ ला प्रत्येकी एक लाख याप्रमाणे एकूण पाच लाख रुपये युवराज मोरे याला दिले. परंतु पैसे दिल्यानंतरही जनरल मजूरचा ऑर्डर निघाला नाही. यामुळे ते हतबल झाले आणि पाच लाख रुपये परत मागण्यासाठी युवराज मोरे यांच्याकडे तगादा लावला. तेंव्हा त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे हतबल झालेल्या सुनिता बेलेकर यांनी वरोरा येथे येऊन शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांची भेट घेतली आणि कैफियत मांडली. तेव्हा घटनेचे गांभीर्य ओळखून मुकेश जीवतोडे यांनी लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या कार्यालयात जाऊन घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलीस तक्रार होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आणि आरोपीकडून फसवणूक झालेली पाच लाख रुपयांची रक्कम देखील जप्त केली व त्या महिलेला न्याय मिळाला.शिवसेनेने घेतलेल्या आक्रमक पवित्रामुळेच हा न्याय मिळाल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील तीन वर्षांपासून एकोणा माईन्स मधील प्रकल्पग्रस्तांसोबत हा प्रकार सूरु असून पोलीस चौकशी मधून या मागच्या रॅकेटचा परदा फाश होणार असल्याचा विश्वास मुकेश जीवतोडे यांनी व्यक्त केला. तसेच वेकोली अधिकारी, कर्मचारी आणि खाणी हे सर्व केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असल्याने यापुढे गरज पडल्यास आपण सदर प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी देखील करणार असल्याचे मुकेश जीवतोडे यांनी सांगितले. अशा प्रकारे अन्य कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिवसेनेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी या माध्यमातून केले. या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे, उपजिल्हाप्रमुख अमित निब्रड, युवासेना जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी,विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले,शहर प्रमुख संदीप मेश्राम,नगर सेवक दिनेश यादव ,बंडु डाखरे,उपतालुका प्रमुख सागर पिंपळकर,गणेश जानवे , भूषण बुरीले,अनिल गाडगे, पीडित महिला सुनीता बेलेकर, तिचा मुलगा प्रफुल बेलेकर उपस्थित होते.

Comments