वरोऱ्यातील डब्ल्यू एस एफ चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लातूर विभाग तर मुलींच्या गटात पुणे विभाग विजयी*
वरोऱ्यातील डब्ल्यू एस एफ चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात लातूर विभाग तर मुलींच्या गटात पुणे विभाग विजयी*
वरोरा स्पोर्टस फाउंडेशन वरोरा व लोक शिक्षण संस्था वरोडा यांच्या संयुक्त विद्यमाने तथा महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने आयोजित महाराष्ट्र राज्य ज्युनिअर गट आंतर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही लोकमान्य महाविद्यालयाच्या स्वर्गीय मनोहर भाऊ पाटील क्रीडा परिसरात खेळविल्या गेली. या स्पर्धेत मुलांच्या गटात लातूर विभागाने कोल्हापूर विभागावर ३-० अशा फरकाने मात करीत डब्ल्यू एस एफ चषकावर आपला हक्क बजाविला व कोल्हापूर विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय स्थानाकरिता झालेल्या सामन्यात मुंबई विभागाने नागपूर विभागावर मात करीत तृतीय स्थान पटकाविले.
मुलींच्या गटात पुणे विभागाने कोल्हापूर विभागावर ३-० अशी मात करीत विजेतेपद पटकाविले तर कोल्हापूर विभागाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मुलींच्या गटात तृतीय स्थानाकरिता झालेल्या सामन्यात यजमान नागपुर विभागाने मुंबई विभागावर मात करीत तृतीय स्थान फटकाविले.
स्पर्धेच्या अंतिम दिवशी चंद्रपूर जिल्हा मल्टीपर्पज स्पोर्ट्स अँड व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष श्री रविंद्रजी शिंदे, डॉ. विजय देवतळे अध्यक्ष ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ वरोरा, श्री अनिल काळे शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती वरोरा, उपविभागीय अधिकारी श्री सुभाष शिंदे यांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन स्पर्धाकांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेचे बक्षीस वितरण अहेतेशाम अली माजी नगराध्यक्ष नगरपरिषद वरोरा यांच्या हस्ते संपन्न झाले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राध्यापक श्रीकांत जी पाटील सर उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर हेमंतजी खापणे, श्री समीर बारई, पराग पत्तीवार, श्री विनोद भोयर साहेब एम एस सी बी वरोरा, विनोद नंदुरकर, महाराष्ट्र राज्य वॉलीबॉल संघटनेचे सचिव श्री विरल शहा महाराष्ट्र संघटनेचे मार्गदर्शक प्राध्यापक डीडी हांडे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा डॉ. पिलगुलवार सर यांनी केली तर श्री गजानन जिवतोडे यांनी आभार प्रदर्शन केले.
तत्पूर्वी स्पर्धेच्या दुस-या दिवशी गुणवंत खेळाडूचा, पंचाचा व मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रम सौ सुवर्णरेखाताई पाटील यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लोकमान्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस के सिंह हे होते. यावेळेस वरोरा शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आयुष नोपाणी(भापोसे), श्री करणजी देवतळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री अविनाशजी पुंड सहीत आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री बाळूभाऊ धानोरकर यांनी मैदानात उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता लोकशिक्षण संस्था वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोरा यांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment