रवींद्र शिंदे यांनी एक हात मदतीचा म्हणून आर्थिक स्वरूपात मदत
वरोरा/ भद्रावती भद्रावती तालुका येथील मौजा आष्टा येथे क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी मुधोली येथील सरपंच बंडू पाटील ननावरे यांनी सांगितले की मुधोली येथील युवा शेतकरी कैलास भाऊराव दडमल यांचे शेतात जंगली श्वापदे घुसून त्यांच्या संपूर्ण पिकाचे नुकसान केले. सततची नापिकी, दुष्काळ, व जंगली श्वापदांचा त्रास याला कंटाळुन या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्याच्यावर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे कर्ज होतो.सदर माहिती मिळताच स्व.श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी एक हात मदतीचा म्हणून आर्थिक स्वरूपात मदत केली. याप्रसंगी तुळशीराम श्रीरामे, बंडू पाटील ननावरे, मारोती गायकवाड, पंडित पाटील कुरेकार, शंकरराव गायकवाड अध्यक्ष मुधोली आदिवाशी सेवा संस्था, सोमेश्वर पेदाम व गावकरी मडळी आणि आप्त परिवार यांची उपस्थित होते.
Comments
Post a Comment