छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलनशिंदे सरकारचा केलात निषेध

छावा छात्र संघटनेचे मारेगावात धरणे आंदोलन
शिंदे सरकारचा केलात निषेध 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  १३,६०० हेक्टरी घोषणा करूनही तोडगी मदत  मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून  हेक्टरी ५०,००० मदत द्या.

यवतमाळ/मारेगाव : सुरज झोटिंग
मो.९२८४०६०८२०
मारेगाव : पर्जन्यवृष्टीने शेतपिके उध्वस्त झाली.शासनाने दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा केली.मात्र शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत आहे.अशातच शिंदे सरकारच्या बोथट धोरणा विरोधी गगनभेदी घोषणा देत मारेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा अशी आर्जव मागणी छावा छात्र संघटने कडून करण्यात आली.मारेगाव तालुक्याला पर्जन्यवृष्टीने झोडपून शेतकऱ्यांचे उभी पिके उध्वस्त केली. सरकारने मदतीची १३,६०० हेक्टरी घोषणाही केली.मात्र तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना ही मदत तोडकी स्वरूपात मिळत असल्याचे वास्तव आहे.हा सरकारचा केवळ देखावा बंद करावा व शेतकऱ्यांना निकषाप्रमाणे मदत करावी अशी मागणी मारेगाव मध्यवर्ती बँक समोर धरणे आंदोलन करतेवेळी करण्यात आली.यावेळी शासन विरोधी घोषणा देत वर्तमान सरकार हे उद्योजकांचे कर्ज माफ करणारे असून कृषी प्रधान देशाचा पोशिंदा मात्र आत्महत्या करतो आहे.मात्र सरकार तगलादू धोरण अवलंबित असल्याचा आरोप करीत  शासनाच्या या दुटप्पी धोरणाचा तिव्र शब्दात निषेध करण्यात आला.
      प्रदेशाध्यक्ष अनिल पारखी , महिला विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रतिभा तातेड , जिल्हाध्यक्ष राजू जुनगरी ,विदर्भ प्रांत अध्यक्ष विलास बुरांन या पदाधिकारी सह राहुल सूर , अनिल बोढाले , संदीप हूसुकले, सुधाकर कोंडेकर , दादा बोकडे , अनंता घोटेकर यांचेसह बहुसंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments