चंदनखेडा येथे स्वच्छता पंधरवडा व गांधी जयंती साजरी करण्यात आली

चंदनखेडा येथे स्वच्छता पंधरवडा  व गांधी जयंती साजरी करण्यात आली

      भद्रावती तालुक्यातुल सांसद आदर्श ग्राम चंदनखेडा येथे आज दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी   राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांची  १५३ वि जयंती उत्सव साजरा करण्यात आले. तसेच शासनाकडून राबवीत असलेल्या स्वच्छता पंढरवाड्या निमित्याने स्वच्छता करण्यात आली. सर्व प्रथम गावातील गांधी चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे मल्याप्रण सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे व उपसरपंच सौ. भरती शरद उरकांडे यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमे व लाल बहाद्दूर शात्री यांचा प्रतिमेला माल्याप्रण करून पुजण करण्यात आले या प्रसंगी सरपंच श्री.नयन बाबाराव जांभुळे उपसरपंच सौ. भरती शरद उरकांडे ग्राम विकास अधिकारी श्री किशोर नाईकवार तसेच सर्व ग्राम पंचायत सदस्य गन तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments