मौलाना अब्दुल कलाम आझाद जयंती साजरी

मौलाना अब्दुल कलाम आझाद जयंती साजरी 



भद्रावती : मौलाना अब्दुल कलाम आझाद हे शिक्षणप्रेमी होते. अत्यंत विपरीत परिस्थितीवर मात करीत त्यांनी शिक्षण घेतले. कष्ट घेऊन मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी केला. आजच्या युवकांनीही त्यांच्या कर्तुत्वाचा आदर्श समोर ठेवीत आयुष्यात मार्गक्रमण केले पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांनी व्यक्त केले. ते विवेकानंद विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त बोलत होते. यावेळी योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे सचिव माधव कवरासे उपस्थित होते. पुढे बोलताना प्राचार्य उमाटे यांनी सांगितले की, आयुष्यात खडतर मेहनत, कष्ट आणि परिश्रम घेतले तर माणूस यशाकडे  निश्चितच वाटचाल करू शकतो. याचे उदाहरण म्हणजे मौलाना आझाद यांचे व्यक्तिमत्त्व होय. यावेळी कार्यक्रमाचे संचालन डॉ. उत्तम घोसरे, प्रास्ताविक डॉ. रमेश पारेलवार,आभारप्रदर्शन डॉ. यशवंत घुमे यांनी मानले. यावेळी डॉ.बंडू जांभूळकर, ग्रंथपाल डॉ.सुधीर आष्टुनकर, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा.संगिता बांबोळे, डॉ.प्रकाश तितरे,प्रा. मोहीत सावे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments