भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा यांची जयंती "जनजातीय गौरव दिवस" विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रकानुसार आयोजित करण्यात आली होता. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. यशवंत घुमे होते. प्रमुख अतिथी म्हणून वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय टोंगे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. उत्तम घोसरे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बंडू जांभुळकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना "मानव जातीला आपले हक्क प्राप्त करून घेण्यासाठी भगवान बिरसा मुंडांनी जी चळवळ उभारली त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. अमोल ठाकरे, प्रास्ताविक डॉ. बंडू जांभुळकर, आभारप्रदर्शन डॉ.उत्तम घोसरे यांनी केले. यावेळी ग्रंथालय विभागप्रमुख डॉ. सुधीर आष्टुनकर, मराठी विभागप्रमुख डॉ. रमेश पारेलवार, इतिहास विभागप्रमुख डॉ. जयवंत काकडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment