भद्रावती : "२४ नोव्हेंबर १९२६ रोजी अधिमाणसाचे म्हणजे एकप्रकारे श्रीकृष्ण - तत्वाचे अवतरण झाले. पूर्णयोग ज्याला अतिमानसयोग असेही संबोधले जाते. त्या योगाच्या वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा असल्यामुळे या दिवसाला विशेष महत्व आहे. २४ नोव्हेंबर हा दिवस पांडेंचेरीस्थित अरविंद आश्रमाचा स्थापना दिन सुद्धा आहे" असे विचार श्री अरविंद सोसायटी सेंटर भद्रावतीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.नामदेव उमाटे यांनी व्यक्त केले. ते श्री अरविद सोसायटी सेंटर भद्रावती व योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक -मित्र मंडळ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने २४ नोव्हेंबर २०२२ ला विवेकानंद महाविद्यालयातील माॅ.अरविंद सभागृहात सिद्धी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महायोगी श्री अरविंद व श्री माँ च्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मेडिटेशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव कवरासे, आभारप्रदर्शन सेवानिवृत्त प्राचार्य विठ्ठल मांडवकर यांनी केले.यावेळी प्रा. धनराज आस्वले, मधुकर बांदूरकर, भाऊराव कुटेमाटे, पांडुरंग चिडे, मोहनदास देशमुख, मुर्लीधर पारखी, बाबाराव बिबटे, उध्दव कुचनकर , नामदेव तिखट,बबन शेंबळकर ,पंढरी गायकवाड, मधुकर बोधाने, उमाजी ठाकरे, केशव ताजने, प्रा. अमोल ठाकरे यांच्यासह इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
Comments
Post a Comment