समाज एकजुटीसाठी विविध उत्सवाचे आयोजन महत्वाचे- रमेश मेश्राम यांचे प्रतिपादन.*भद्रावतीत गोंडीयन आदिवासी वीर वीरांगणा सोहळ्याचे आयोजन*.
*भद्रावतीत गोंडीयन आदिवासी वीर वीरांगणा सोहळ्याचे आयोजन*.
भद्रावती :-सण, उत्सव हे समाजाचे प्रतीक असतात या माध्यमातून समाज बांधव एकत्रित येऊन त्यांच्यातील सलोखा वाढतो व समाज संघटन मजबूत होते. त्यामुळे सण, उत्सव हे समाज एकजुटीचे प्रभावी माध्यम बनले असून समाजाच्या एकजुटीसाठी विविध सामाजिक उत्सव साजरे करणे गरजेचे असल्याचे मत गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटनेचे अध्यक्ष रमेश मेश्राम यांनी व्यक्त केले.
स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे गोंडीधर्मीय आदिवासी एकता संघटनेतर्फे गोंडीयन आदिवासी वीर वीरांगना जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन मधुकर मेश्राम यांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी छिदवाडा येथील देवराव भलावी तर प्रमुख पाहुणे म्हणून बेबीताई मेश्राम ,अशोक मडावी, चिंतामण आत्राम, कैलास मेश्राम, मारोती जुमनाके, नगरसेविका शितल गेडाम, अनिता गेडाम, विजय कुंमरे, लक्ष्मण सोयाम, प्रसन्ना गड्डमवार, भाऊराव जुमनाके, रवी मेश्राम, ठाणेदार गोपाल भारती, एड. युवराज धानोरकर आदी मान्यवर मंडळींची मंचावर उपस्थिती होती.
सकाळी दहा वाजता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शहरातून गोंड राजे महाराज रावण मडावी यांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत समाजाचे पारंपारिक नृत्य, वाद्य ,बँड पथकासह पारंपारिक वेशभूषा केलेले समाज बांधव तथा हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. या आगळ्यावेगळ्या शोभायात्रेने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले. या शोभा यात्रेचे नेतृत्व महादेव सिडाम, संदीप कुंमरे, निरंजन आत्राम व शुभम मडावी यांनी केले. शोभा यात्रेच्या सांगतेनंतर प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आला. यापूर्वी आदल्या दिवशी तहसील कार्यालया जवळील भिमाल पेन पेंनठाणा मैदानावर एका रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 40 समाज बांधवांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले कर्तव्य बजावले. रात्रोला आदिवासी गोंडी पारंपारिक नृत्य स्पर्धा व रेकॉर्डिंग डान्स स्पर्धा घेण्यात आली. यातील विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या प्रास्ताविकेतून रमेश मेश्राम यांनी सदर संघटने कडून 2017 पासून विविध उपक्रमांतर्गत समाजाला एकत्र आणण्याच्या व समाजाच्या समस्यांना व अन्यायांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाज बांधवांना विविध विषयावर मार्गदर्शन केले. सदर महोत्सवाला विदर्भातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अविनाश पंधरे यांनी तर उपस्थिताचे आभार संदीप नैताम यांनी मानले.
या महोत्सवाच्या यशस्वी ते करिता महादेव सीडाम, विनोद शेडमाके, गोलू गेडाम, गणेश टेकाम,बालू टेकाम, गंगाधर गेडाम,पिंटू मरसकोल्हे ,एड. प्रमोद गेडाम, जितेंद्र मरसकोल्हे, त्रिशूल मरस कोल्हे, पूरब सिडाम, जगदीश पेंदाम, निरंजन आत्राम, भास्कर वरखडे, शुभांगी मेश्राम, विद्या किनाके, आदींसह सर्व गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटने तर्फे अथक परिश्रम घेण्यात आले.
Comments
Post a Comment