वरोरा : येथील विदर्भ विकास पत्रकार समितीच्या वतीने आयोजित सामान्य ज्ञान परीक्षेचा पुरस्कार वितरण सोहळा दिनांक १२ डिसेंबर रोजी स्थानिक नगर भवन मध्ये आयोजित करण्यात आला आहे.
वरोरा येथील विदर्भ विकास समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली होती. वर्ग पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता एक गट तर दुसरा गट हा अकरावी पासून पुढे खुला ठेवण्यात आला होता. या परीक्षेत दोन्ही गटात ३७७२ परीक्षार्थींनी सहभाग घेतला होता.या परीक्षेत उत्कृष्ट गुण घेणाऱ्या प्रथम १५ परीक्षार्थींची निवड करण्यात आली असून त्यांचा पुरस्कार वितरण सोहळा दि ११ डिसेंबर रोजी स्थानिक नगर भवन मध्ये दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रथम येणाऱ्या प्रत्येक गटातील तीन परीक्षार्थींना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तर इतर परीक्षार्थींना आकर्षक बक्षीस आणि स्मृतिचिन्ह मिळणार आहे. खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या कार्यक्रमाला आमदार प्रतिभाताई धानोरकर,माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी आणि एक्सलंड अकॅडमीचे प्राध्यापक अभय टोंगे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार रोशन मकवाणे, पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे , वरोरा तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सागर वझे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मिलिंद देशपांडे, पारस ऍग्रो प्रोसेसर चे संस्थापक संचालक अमोल मुथा यांची उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन विदर्भ विकास पत्रकार समितीचे अध्यक्ष चैतन्य लुतडे, उपाध्यक्ष अनिल पाटील,सचिव राजेंद्र मर्दाने, कोषाध्यक्ष शाहिद अख्तर, प्रवीण कंधारे यांच्यासह इतर सदस्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment