35 वर्षावरील स्पर्धकांना संधी
वरोरा १९/१/२३
चेतन लूतडे
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या नेतृत्वात वरोरा शहरांमध्ये दोन दिवसाचे क्रिकेट सामन्याचे आयोजित करण्यात आले आहे.
प्रत्येक संघाला प्रवेश फी असणार असून यामधील प्रत्येक खेळाडूसाठी 35 वर्षावरील वयोमर्यादा क्रिकेट खेळण्यासाठी लागणार आहेत.
यामध्ये 1) मॉर्निंग वॉक
2 ) वर्धा पावर
3 ) ग्रामसेवक संघटना
4 ) लोकमान्य कॉलेज
५) क्रीडा संकुल
६) डॉक्टर असोसिएशन
वरील संघातील सर्व खेळाडू पस्तीस वर्षावरील असून आपल्या क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती या मुख्यमंत्री चषकात खेळताना दिसणार आहे.
मुख्यमंत्री चषकासाठी प्रथम पारितोषिक ११०००/- रुपये रोख व चषक
द्वितीय पारितोषिक ५०००/- व चषक
मॅन ऑफ द मॅच १०००
मॅन ऑफ द सिरीज १०००
बेस्ट बॉलर: १०००
बेस्ट बेस्टमन:१०००
बेस्ट कीपर:१०००
बेस्ट फिल्डर: चषक
बेस्ट प्रशिक्षक: चषक
असणार असून या स्पर्धा आनंद निकेतन कॉलेजच्या मैदानावर बघायला मिळणार आहेत. प्रत्येक सामना रंगतदार होणार असून यासाठी सर्व स्पर्धकांची रंगीत तालीम सुरू केली आहे.
वरील सर्व आयोजन जिल्हाप्रमुख शिवसेना नितीन मत्ते करत असून जिल्ह्यातील डॉक्टर ,वकील, शिक्षक, पत्रकार, व्यवसाय एकत्र येऊन दिनांक 21, 22 ला सकाळी शनिवार, रविवार दोन दिवशी लीग मॅचेस खेळण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment