अध्यक्षपदी सुनील बिपटे तर सरचिटणीस पदी जावेद शेख.
भद्रावती : स्थानिक वरद विनायक गणेश मंदिर परिसरात एका बैठकीदरम्यान देशात अग्रगण्य पत्रकाराची संघटना असलेल्या व्हाॅईस ऑफ मीडिया ची भद्रावती तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मिडिया चे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. यशवंत घुमे होते. यावेळी तालुका कार्यकारणी त सर्वानुमते अध्यक्ष - सुनील बिपटे, उपाध्यक्ष- सुनील पतरंगे, कार्याध्यक्ष- वतन लोणे सरचिटणीस- जावेद शेख, सहसचिव - रवी भोगे, कोषाध्यक्ष - अब्बास अजानी, कार्यवाहक - ईश्वर शर्मा, संघटक - संदीप झाडे, प्रसिद्धीप्रमुख- रवी बघेल, सदस्य सर्वश्री शंकर डे, रवी करदुल्ला, रत्नाकर ठोंबरे इत्यादींचा समावेश आहे. सदर कार्यकारणी कार्यकारणी ही दोन वर्षासाठी आहे .नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment