मे.अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी जमिनीचा भाव ठरवितांना ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्या.सरपंच प्रदीप महाकुलकर यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी
मे.अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी जमिनीचा भाव ठरवितांना ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना विश्वासात घ्या.
सरपंच प्रदीप महाकुलकर यांची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी
भद्रावती: तालुक्यातील टाकळी,जेना व बेलोरा याठिकाणी मे. अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड द्वारा खुल्या व भूमिगत कोळसा खाणीसाठी शेतजमिनी संपादित करतांना व जमिनीचा भाव ठरवितांना गावातील ग्रामस्थांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याचे आदेश कंपनीला देण्यात यावे.या आशयाचे निवेदन पानवडाळा ग्रामपंचायतचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
मे. अरविंडो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लिमिटेड द्वारा टाकळी,जेना व बेलोरा खुल्या व भूमिगत कोळसा खणीसाठी लागणारी ९३६ हे.आर.जमिनी करिता झालेल्या पर्यावरण जनसुनावणी मध्ये कंपनीने ठरविल्याप्रमाणे एकाचवेळी संपादित करण्यात यावी.आणि शेतकऱ्यांशी चर्चा करूनच जमिनीचे दर निश्चित करण्यात यावे.याकरिता स्थानिक व कंपनी प्रशासनाने थेट प्रकल्पग्रस्त व ग्रामपंचायतशी चर्चा कण्याचे आदेश देण्यात यावे.आत्तापवेतो मा.मुख्यमंत्री म. रा.मुंबई,मा.केंद्रीय कोळसा मंत्री,भारत सरकार ,नवी दिल्ली,मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर, स्थानिक व कंपनी प्रशासनाला अनेकदा निवेदने देऊन देखील कोणतीही दखल घेतली गेली नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे जमिनीचे दर ठरविताना सदरील प्रकल्पात येणाऱ्या गावातील ग्रामस्थांना व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना चर्चेकरिता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात यावे.परिणामी उद्भवणाऱ्या परिस्थितीस स्थानिक व कंपनी प्रशासन जबाबदार राहील.अशा आशयाचे मागणीचे निवेदन ग्रामपंचायत पानवडाळाचे सरपंच प्रदीप महाकुलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
Comments
Post a Comment