लोनगाडगा येथील घटन
वरोरा तालुका प्रतिनिधी- बाळू भोयर
वरोरा ते माढळी रोड दरम्यान लोनगाडगा येथील तरुण राजू बाबाराव दारुंडे वय वर्ष 45 हा सकाळी 6 वाजता मॉर्निंग वॉकला जात असताना माढेळी कडून एकोणा माईंस कडे जाणाऱ्या भरदार वेगवान ट्रकने त्याला उडवले व त्याचा त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना आज सकाळी 6 वाजता घडली.
सकाळी तो त्याची पत्नी दोघेही घरून सकाळी फिरायला गेले होते. मागून येणाऱ्या ट्रक चा अपघात झाला त्याच दरम्यान एक मोटरसायकलस्वार त्याच दरम्यान ट्रक च्या प्रकाशाने डोळे दिपल्याने त्याचा सुद्धा अपघात होऊन मृतकाच्या बाजूला पडला असल्याचे समजते.
लोनगाडगा वंधली पांझुर्णी या गावातील लोकांनी त्वरित ट्रक बंद करण्यात यावे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
अपघातानंतर उपजिल्हा रुघणालायत नेण्यात आले व त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
वेकोलीने कोळसा वाहतुकीसाठी रोडचे नियोजन न केल्यामुळे वारंवार अपघाताचे प्रमाण वाढत असून स्थानिक लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष झाल्यामुळे वारंवार स्थानिक समस्या वाढत असल्याचे चित्र या भागात दिसत आहे.
Comments
Post a Comment