देशी दारूचे दुकान लावण्यासाठी ग्रामपंचायत नागरी येथे कल्याणचे शेट्टी यांच्या दुकानाला परवाना

देशी दारूचे दुकान लावण्यासाठी ग्रामपंचायत नागरी येथे  कल्याणचे शेट्टी यांच्या दुकानाचा परवाना

अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतला निर्णय

निर्णयानंतर नागरिक गावातील राजकारण तापले

वरोरा : तालुक्यातील नागरी ग्रामपंचायत ने देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी केलेल्या कार्यवाहीत कोणताही गैरप्रकार झाला नसून नियमाला धरून ग्रामसभा घेऊन  ठराव घेण्यात आला आहे.याला काही ग्रामस्थांचा होत असलेला विरोध अनाकलनीय असून तो राजकीय हेतूने प्रेरित तसेच गावातील अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देणारा असल्याचे उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभा अध्यक्ष आणि तंटामुक्त समिती अध्यक्ष यांनी दि ७ फेब्रुवारी २०२३ रोजी वरोरा येथे आयोजित पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.


वरोरा तालुक्यातील नागरी ग्रामपंचायतकडे सीएल-३ देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी लक्ष्मी अशोक शेट्टी राहणार भोईवाडा स्टेशन रोड कल्याण, जिल्हा ठाणे यांनी रितसर अर्ज केला होता.सदर अर्ज ग्रामपंचायत च्या नोव्हेंबर महिनीतील मासिक सभेत ठुवून या करिता ग्रामसभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने साळुंखे ग्राम विकास अधिकारी  ग्रामपंचायत नागरी यांनी दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजी ग्रामसभेची नोटीस काढली काढून दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरी च्या प्रांगणात ग्रामसभा आयोजीत केली व त्यासाठी शाळेच्या मुख्याध्याप कडे आणि संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे पत्र पाठवून परवानगी घेतली गेली होती. या ग्रामसभेमध्ये नागरी येथे देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देणे, तांडा वस्ती घोषित करणे, आणि तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे प्रस्तावित व मंजूर करणे असे तीन विषय होते. सदर ग्रामसभेचे नोटीस  तहसीलदार वरोरा, संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती वरोरा आणि पोलीस निरीक्षक वरोरा यांना पाठविण्यात आले होते. तसेच पोलीस निरीक्षक यांना प्रतिनिधी पाठवण्याची विनंती देखील करण्यात आली होती. ठरल्या प्रमाणे २९ डिसेंबर २२ रोजी ११ वाजता ग्रामसभेला सुरुवात झाली. या ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह २४० ग्रामस्थ आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या ग्रामसभेत सर्वप्रथम सभा अध्यक्ष म्हणून दिलीप टिपले यांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष ग्रामसभेला सुरुवात झाली. ग्रामविकास अधिकारी यांनी विषय पटलावरील पहिला विषय नागरी येथे सीएल-३ देशी दारू विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबत चा वाचून दाखवला आणि त्यावर उपस्थित ग्रामस्थांची मते मागितली. तेव्हा २४० पैकी २२५ उपस्थितांनी ठरावाच्या बाजूने आपला कौल दिला. तर १५ ग्रामस्थांनी याला विरोध केला. यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दारू विक्री दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय २२५ विरुद्ध १५ मतांनी मंजूर झाला असल्याचे जाहीर करून तसा ठराव घेतला.याच प्रमाणे इतर दोन विषय देखील ग्रामसभेत पारित झाले.ही ग्रामसभा शांततेचे पार पडली.ठराव घेतांना
 कोणताही गैरप्रकार झाला नसताना काही ग्रामस्थांनी ग्रामसभा झाल्यानंतर काही दिवसांनी देशी दारू दुकानाला विरोध सुरू केला आहे.देशी दारू विक्री दुकान हे गावा बाहेर पाचशे पेक्षा अधिक मीटर अंतरावर राहणार आहे. तेंव्हा हा विरोध अनाकलनीय असून तो राजकीय हेतूने प्रेरित आहे तसेच गावात सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्रीलाही प्रोत्साहन देणार आहे. असे स्पष्टीकरण पत्रकार परिषदेला उपस्थित उपसरपंच चंद्रशेखर मुजबैले,पंचायत समितीचे माजी सभापती तथा ग्रामसभेचे अध्यक्ष दिलीप टिपले, ग्रामपंचायत सदस्य मंगेश भलमे, शरद भलमे,तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रवीण बुरीले,सेवासहकारी सोसायटी सदस्य विठ्ठल वरभे यांनी केले आहे.तसेच गावात दोन वाईन बार सुरू असून त्याला कुणाचाही विरोध नाही. यामुळे गावा बाहेर सुरू होत असलेल्या देशी दारू विक्रीला विरोध करायचाच होता तर गावातील त्या वाईन बारला विरोध का केला नाही असाही प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित करण्यात आला . पंचायत समितीने दोन विस्तार अधिकारी मार्फत या प्रकरणी चौकशी केली. त्यात त्यांना कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही.असे असताना ग्रामपंचायत  ला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतुन करण्यात आला.

*अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई व्हायला हवी*
 नागरी गाव परिसरात काही व्यक्ती देशी दारूची अवैध दारू विक्री करतात. ही दारू वर्धा जिल्ह्यातून पुरवली जात असून ती दुय्यम दर्जाची आहे तसेच ती चढ्या किंमतीत विकली जात आहे . ही दारू सेवन करणाऱ्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असून प्रसंगी एखाद्याचा जीव जाण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. असे असताना काही व्यक्ती कमी श्रमात जास्त मोबदला मिळण्याच्या हेतूने हा अवैध व्यवसाय गावात सर्रास पणे करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली .

Comments