भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वसाहतीत बिबट्याचा महिलेवर हल्ला

भद्रावती येथील आयुध निर्माणीच्या वसाहतीत बिबट्याचा महिलेवर हल्ला 

भद्रावती येथे आयुध निर्माण येथील सेक्टर 9 या लोकवस्तीत बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या  सुमारास घडली. 
विमलादेवी टिकाराम (४२) असे महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसापूर्वी याच भागात १८ फेब्रुवारीच्या पहाटे वनविभागाने लावलेल्या पिंजर्यात बिबट जेरबंद झाला होता. यावरून या भागात बिबट्याचे वास्तव्य असल्याचे पुढे आले आहे. विमलादेवी ही महिला नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरायला निघाली. अशातच परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घेतली.बिबट्याने महिलेची मान जबड्यात पकडली. बिबटयाचा प्रतिकार करण्यात ती यशस्वी झाल्याने भागात पिंजरे लावले आहेत. थोडक्यात बचावली. मानेला गंभीर इजा झाली आहे. जखमी अवस्थेतील विमलादेवी यांच्यावर आयुध निर्माणीच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. 
माहिती मिळताच क्षेत्र सहायक विकास शिंदे, वनरक्षक धनराज गेडाम यांनी भेट देऊन महिलेला पुढील उपचारार्थ चंद्रपूरला खासगी रुग्णालयात रवाना केले आहे.

सूचनांकडे दुर्लक्ष 

वन विभागाने आयूध निर्माणी प्रशासनाला मानव वस्ती भागातील जंगलाची कटाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यांनी अजूनपर्यंत सूचनांचे पालन केलेले नाही. नागरिकांनी सोबत कुत्र्यान फिरू नये कुत्रे पाळू नयेत आणि पहाटे सायंकाळी व रात्रीला रस्त्याने सायकल व दुचाकीने फिस नदी अशाही सूचना दिल्या होत्या. परंतु याचेही पालन केले जात नाही.

जाहिरात

Comments