अन...सचिनच्या भेटीला 'क्रियांग ' आला दिल्लीहुन!

अन...सचिनच्या भेटीला 'क्रियांग ' आला दिल्लीहुन!
फिरोज पठाण/चिमूर:-
क्रिकेट जगताचा देव म्हणून ज्यांना ओळखल्या जाते, त्या सचिन तेंडूलकर यांचे लाखो चाहते आहेत. असाच एक चाहता दिल्ली ग्रेटर नोएडा येथून थेट सचिनच्या भेटीला ताडोबात आला. भेट घेतली, संवाद झाला आणि क्रियांगची सचिनची पाठ थोपाटली. क्रियांगच्या बॉलवर  सचिनने ऑटोग्राफ दिले. त्यानंतर तो ताडोबा बाहेर पडला. 10 वर्षीय क्रियांग व सचिन यांच्या भेटीची आठवण बांबू रिसार्टमध्ये अविस्मरणीय अशीच ठरली आहे. 
दिल्ली  ग्रेटर नोएडा येथील क्रियांग हा सचिनचा जबरदस्त फॅन आहे. त्याने सचिनला क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा पाहिले व ऐकलेही आहे. मात्र प्रत्यक्षात भेट झाली नाही. त्यामुळेच भेटण्याची इच्छा नेहमीच वडिलांकडे व्यक्त करीत असे. अखेर ताडोबा सफारी करीता आलेल्या सचिनला भेटण्याचा योग मंगळवारी ताडोबात जुळून आला. 10 वर्षाचा क्रियांग हा सध्या दिल्ली वरून नागपूरात आपल्या नातेवाईकांकडे आला होता. त्याला सचिन ताडोबा व्याघ्रदर्शनाकरीता आल्याची माहिती माध्यमांद्वारे मिळाली आणि क्रियांगला सचिनला भेटण्यापासून राहावले नाही. वडिलांसोबत त्यांनी  ताडोबा अभ्यारण्य गाठले. सोबत बॉलघेऊन आला होता. ताडोबात आल्यानंतर बांबू रिसार्ट मध्ये सचिन असल्याचे त्याला कळले. त्यांनी आपण सचिन सरांना भेटण्याकरीता आल्याचे व्यवस्थापनाला सांगितले. आणि क्रियांगची भेट ठरली.
जाहिरात 
 सायंकाळी सचिन साडेचारच्या सुमारास बांबू रिसार्ट मधील मुक्काम हलविण्याच्या तयारीत असताना 10 वर्षाचा क्रियांग आपल्याला भेटण्याकरीता आल्याची माहिती मिळाली. आणि भेटीचा क्षण जुळून आला.  दोघांचीही बांबू रिसार्ट मध्ये भेट झाली. सचिनने क्रियांगला क्रिकेटर व शिक्षणात चांगली प्रगतीकरण्याकरीता अभ्यास करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाब्बासकीची थाप क्रियांगच्या पाठीवर पडली आणि क्रियांग धन्य झाला. यावेळी क्रियांगने सोबत आणलेल्या बॉलवर मास्टर ब्लॉस्टर सचिनने ऑटोग्राफ करावे अशी इच्छा व्यक्त केली. सचिने बॉलवर ऑटोग्राफ दिला. त्यांनतर मास्टर ब्लॉस्टरनी पत्नी अंजली व मित्रांसह ताडोबाचा निरोप घेतला. तर क्रियांग ऑटोग्राफ केलेल्या बॉल्सह ताडोबा बाहेर पडला. 

Comments