विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या चंद्रपूर एन्ट्रीने प्रशासकीय कामाला वेग

विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या चंद्रपूर एन्ट्रीने प्रशासकीय कामाला वेग 
          शिवसेनेच्या प्रयत्नाने २३ शेतकऱ्यांना मिळाली ११ लाखाची मदत 

वरोरा :- तालुक्यातील चरुरखटी - नायदेव या रस्त्याने एकोना कोळसा खदान मधून जी एम आर कंपनी मध्ये कोळसा वाहतूक केली जाते . या वाहतुकीमुळे रस्त्यालगत असणाऱ्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  शिवसेनेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे  जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी  या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निवेदन देऊन गेल्या एक वर्षांपासून   पाठपुरावा केला होता. तसेच नुकतेच  विधानपरिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असतांना त्यांना या समस्येचे निवेदन देताच प्रशासकीय कामाला वेग आला असून १६ फेब्रुवारीला नुकसानग्रस्त २३ शेतकऱ्यांना ११ लाख रुपये नुकसान भरपाईचे धनादेश देण्यात आले . 

शहरालगत  एम आय डी सी येथे  २ वीजनिर्मिती केंद्र या  कंपन्यांना एकोना कोळसा खदान येथून कोळसा पुरविला जातो . नियमबाह्य केल्या जाणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे चरुरखटी - नायदेव रस्त्यालगत असणाऱ्या शेतींचे  नुकसान होत आहे . या बाबत वरोरा तहसीलदार यांचे कडे  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी  नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन दिले होते . निवेदनाची दखल न घेतल्याने व समस्या जैसे थे असल्याने शेतकऱ्यांनी शिवसेना कार्यालय गाठले व शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांच्या समोर आपली व्यथा मांडली. शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि त्याच्यावर होणार अन्याय  शिवसेना कदापि सहन करणार नाही असे म्हणत जिवतोडे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला निवेदन व सदर विषयासंबंधी पाठपुरावा करण्यात आला . संबंधित साझाचे तलाठी , कृषी अधिकारी यांनी मौका चौकशी करून अहवाल तहसील कार्यालय येथे सादर केला . तहसीलदारांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याबाबत आदेश देऊनही कंपनी व्यवस्थापनाने मोबदला दिला नव्हता . हि बाबा मुकेश जिवतोडे यांनी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आलेल्या विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनात आणून दिली होती. दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्यानंतर  प्रशासन कामाला लागले व १६ फेब्रुवारीला २३ शेतकयांना ११ लाखांचा मोबदला देण्यात आला . शिवसेना जिल्हा प्रमुख मुकेश जिवतोडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याने शेतकऱ्यांनी मुकेश जिवतोडे यांचे आभार मानले . मुकेश जिवतोडे व शिवसैनिकांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात आले .यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मनीष जेठानी , भद्रावती तालुका प्रमुख नंदू पढाल, शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम , माजी नगरसेवक दिनेश यादव , बंडू डाखरे , यांच्या सह अनेक शिवसैनिक व  शेतकरी उपस्थित होते .

Comments