राष्ट्रीय सेवा योजना शिबिर म्हणजे संस्काराची गंगोत्री - जयंत टेमुर्डेतालुक्यातील चालबर्डी येथे रासेयो शिबिराचा समारोप
तालुक्यातील चालबर्डी येथे रासेयो शिबिराचा समारोप
भद्रावती : महाविद्यालयांमध्ये मिळणारे संस्कार हे शैक्षणिक असतात. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मिळणारे संस्कार हे संस्कारशील असतात. हे संस्कार अनुभवप्रधान असतात. या सात दिवसीय शिबिरातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी पुढे आदर्श नागरिक म्हणून जगण्यासाठी केला पाहिजे असे विचार विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) वरोरा या शैक्षणिक संस्थेचे कार्यकारी सदस्य जयंत टेमुर्डे यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील चालबर्डी (रै) या गावात सुरू असलेल्या सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था वरोरा चे अध्यक्ष रमेश राजूरकर होते. यावेळी मंचावर स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे अध्यक्ष रवींद्र शिंदे, प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे सचिव माधव कवरासे,सरपंच प्रियंका सोयाम, उपसरपंच गणेश नागपुरे, पोलीस पाटील देऊबाबा परसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश बावणे, मुख्याध्यापक अनिल माथनकर, राष्ट्रीय सेवा योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. विजया गेडाम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. उत्तम घोसरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. घोसरे संचालन कार्यक्रम सहधिकारी डॉ. रमेश पारेलवार तर आभार प्रदर्शन प्रा. अमोल ठाकरे,प्रा.संगिता बांबोळे यांनी केले. पल्लवी आस्वले, आदेश देहारकर या शिबिरार्थींनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयातील डॉ. प्रकाश तितरे, डॉ. गजानन खामनकर,प्रा. मोहित सावे, डॉ. सुहास तेलंग, मुख्य लिपिक सतीश मशारकर, डॉ.यशवंत घुमे यांच्यासह गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने शिबिराची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment