वाघिणीन व तिच्या बछड्याच्या दर्शनाने सचिन भारावला ,ताडोबामध्ये चार बछड्यांचेही झाले दर्शन



वाघिणीन व तिच्या बछड्याच्या  दर्शनाने सचिन भारावला

ताडोबामध्ये चार बछड्यांचेही झाले दर्शन

वरोरा
चेतन लूतडे

वरोरा (चंद्रपूर) : जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य क्रिकेटर जगतात वेड लावत असून यावेळेस क्रिकेट जगतातला देव म्हणून समजला जाणारा सचिन तेंडुलकर यांना वाघांनी भुरळ पडली आहे.

 सचिन तेंडुलकर  शनिवारी सायंकाळी पत्नी अंजली व मित्रांसोबत एका खासगी रिसॉर्टमध्ये  मुक्कामी आला आहे. सचिनने सोमवारी सकाळी अलिझंझा गेट मधून नवेगाव व निमढेला परिसरात सफारी केली. या सफारीत सचिनल च्या परिवाराला निमढेला, रामदेगी परिसरात वाघीण व तिच्या चार बछड्यांचे दर्शन झाले. वाघिणीच्या बछड्यांच्या विविध अदांनी सचिन व अंजली भारावून गेल्याचा प्रसंग सचिनने स्वतः व्हिजीट बुकमध्ये नोंद केली आहे.

जाहिरात..

Comments