धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांनी केला आनंद व्यक्त

धनुष्यबाण आणि शिवसेना नाव मिळाल्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील एकनाथ शिंदे गटातील शिवसैनिकांनी केला आनंद व्यक्त
वरोरा १७/२/२३
चेतन लूतडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला निवडणूक आयोगातर्फे धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना नाव मिळाल्याबद्दल शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून 
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी शिवसैनिकानी ढोल ताशाच्या गजरात पेढे वाटून वरोरा परिसरातील आनंदवन चौकात आतिष बाजी करत आनंद व्यक्त केला. यावेळी महिला कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करीत होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात स्थानिक वरोरा परिसरात मिठाई वाटून आनंद साजरा केला यावेळी त्यांच्यासोबत  नरेश काळे , आशिष ठेंगणे , राजेश डांगे, समीर बारई, समीर हक्के, सुधाकर कुंकुले, आकाश लिगाडे,सौ कल्पना भुसारी ,महीला  जिल्हा संघटिका योगिता लांडगे,उपजिल्हाप्रमुख सौ ज्योती लांडगे , मनीषा लोनगाडगे,सौ तृप्ती हिरादेवे शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकां सह मित्रपरिवार  उपस्थित होते.

Comments