चोरी करण्यासाठी चोर लढवत आहे नवीन शक्ल , सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी

चोरी करण्यासाठी चोर लढवत आहे नवीन शकल

सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी

वरोरा 
चेतन लूतडे

वरोरा शहरात नवीन ठाणेदार कचोरे यांची नियुक्ती झाल्यापासून अवैध धंद्यातील नवीन नवीन समस्यांना तोंड देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. 

वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात महिन्यांपासून घरफोडी, दुकानाचे शटर फोडणे, दुचाकी चोर, सट्टा बाजार, अशा घटनांमध्ये वाढ होत असून यासाठी वरोरा शहरात लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे. मात्र या सीसीटीव्ही ला सुद्धा चकमा देऊन हे चोर चोरी करीत आहे. या चोरांना ओळखण्यासाठी पोलीस शर्तीचे प्रयत्न करून राहिले आहे.
अशातच वरोरा शहरातून एक दुचाकी वाहन व एक घर फोडल्याची घटना घडली असून दोन्ही घटनेत गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.
या घटनेत 22 तारखेला बुधवारी दुपारी गुन्हा नोंद करण्यासाठी फॅशन गाडी  मालकाला बोलावून नोंद करण्यात आली.

पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांनी  घटनास्थळावर येऊन सीसीटीव्ही फुटेज घेतले असल्याचे समजते. मात्र दुचाकी कोणी नेली हे कळू शकले नाही.
अशीच एक घरफोडी घटना नागपूर चंद्रपूर हायवे लगतच्या पेट्रोल पंपाच्या मागे घडली. घरात सर्वच व्यक्ती झोपून होती, असे असताना चोरट्यांनी मागील दारातून प्रवेश करीत खिडकीतून हात टाकून दार उघडले. घरच्यांना जाग आली असता एक मोबाइल आणि सोन्याची अंगठी नेल्याची समजते.
परंतु दोन्ही घटनेत गुन्हा दाखल झाल्या नसल्याचे समजते. 

यापूर्वी वरोरा पोलिस स्टेशनमध्ये अनेक घरफोड्या झाल्या, अनेक दुकानांचे शटर फोडले. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आले. परंतु तोंडाला बांधून चोरट्यांनी चोरी केली. त्यामुळे पोलिसांचे हात त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही.
मात्र काही घटनेमध्ये पोलिसांनी चोरांच्या सवयीवरून त्यांना पकडण्यात यश सुद्धा आलेले आहे. मात्र या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलीस शर्तीचे प्रयत्न करीत आहे.

त्यामुळे नवीन ठाणेदारासाठी वरोरा शहर आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

जाहिरात.

Comments