शेतकरी उत्पादक कंपन्या एकवटल्या.
नाफेडची चना खरेदी कधी सुरू होणार.
5335रू. प्रती क्विंटल रुपयेने खरेदी होणार.
सरकारची हेक्टरी 7.5 क्विंटल उत्पादकता जाहीर
वरोरा
चेतन लूतडे
चंद्रपूर जिल्ह्यातील हरभरा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे दरवर्षी नुकसान होत असून याला जबाबदार सरकारी यंत्रणा ठरत असल्याचे मत शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतकऱ्यांनी केले आहे.
यावर्षी सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 7.5 क्विंटल चना नाफेड तर्फे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्याची जाहीर करण्यात आले आहे. मात्र दरवर्षी शेतकरी हेक्टरी 25 ते 30 क्विंटल चना शेतामध्ये पिकवत आहे. त्यामुळे शासकीय हरभरा खरेदीचे धोरण चुकीचे असल्याचे मत शेतकऱ्यांनी मांडले.
नाफेडची अजूनही चना खरेदी सुरू झाली नसून चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र अजूनही बंद ठेवण्यात आलेले आहे. सर्व केंद्राजवळ पाच हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या चना नोंदणी साठी फॉर्म येऊन आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सात ते आठ दिवसात हे फॉर्म भरणे कठीण काम आहे.
यानंतर या केंद्रापर्यंत बारदाने पोहोचण्याची व्यवस्था व वखार महामंडळाकडे चना ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असणे तितकेच आवश्यक आहे.
ह्या सर्व बाबी नाफेड तर्फे सात ते आठ दिवसात १४ तारखेपर्यंत करायचे आहे. अजून पर्यंत एकाही शेतकऱ्याचे चना पिक नाफेड ने घेतलेले नाही.
त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापाराकडे चना ४४००रू. क्विंटल विकावा लागत आहे.
आणि शासनाने नाफेड तर्फे खरेदीचा भाव 5335 रुपये प्रतिक्विंटल ठरवलेला आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे 835 रुपये प्रति क्विंटल नुकसान सहन करावे लागत आहे.
जाहिरात
*नाफेड तर्फे १११५ भद्रावती तालुका आणि वरोरा तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या नोंदणी झालेले आहे. अंदाजे तीन लाख क्विंटल चना पिकाचे लक्ष वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत असते.
*वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खाजगी व्यापाऱ्यांकडून आतापर्यंत ७०,००० हजार क्विंटल चना खरेदी झाला आहे.
*पिक पेरा नसल्यामुळे बहुतांश शेतकरी आपला चना खाजगी व्यापाराकडे विकतो.
जाहिरात
*ई पिक पेरा ऐवजी हस्तलिखित तलाठ्या मार्फत दिलेला पिकपेरा स्वीकारण्यात यावा. बारदाण्याची उपलब्धता लवकर करून देण्यात यावी.
*चंद्रपूर जिल्ह्याची हरभरा उत्पादकता न वाढल्यास शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
*शासनाने वखार महामंडळात जमा असलेला मागील वर्षीचा चना चालू हंगामात विकल्याने संबंधित कंपन्यांची पूर्तता झाली असून नवीन आलेल्या चना पिकाचे भाव अजून कमी होण्याचे संकेत मिळाले आहे.
जाहिरात.
Comments
Post a Comment