वरोरा
स्थानिक लोकशिक्षण संस्थेत, *'माजी विद्यार्थी मेळाव्याचे'* आयोजन *१९ मार्च रोज रविवारला* लोकमान्य कन्या विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. या माजी विद्यार्थी मेळाव्याचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता होत असून या मेळाव्याचे आयोजन लोकमान्य माजी विद्यार्थी संस्था व लोकमान्य कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असल्याची माहिती लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह विश्वनाथ जोशी यांनी एका पत्रकारपरिषदेत दिली.
यावर्षी लोकमान्य कन्या विद्यालयातील व्हाॅलीबाॅल या खेळाच्या उपक्रमाला ५० वर्षे पूर्ण होत आहे. या ५० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात कै.बळवंत दारापूरकर सरांच्या मार्गदर्शनातून ज्या विद्यार्थीनींनी कन्या विद्यालयाचा नावलौकिक देशभरातील क्रीडा क्षेत्रात निर्माण केला त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
यात खेळात राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या विद्यार्थिनिनीचा समावेश असून या मेळाव्यात दहावी बोर्ड परीक्षेत मेरिट मध्ये आलेल्या माजी विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात येणार आहे.
दुपारी ३.३० पर्यंत होणार्या या मेळाव्यात 'असे घडलो आम्ही ' या सत्रात प्रातिनिधिक स्वरूपात माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष प्रसाद नामजोशी हे माजी खेळाडूंची मुलाखत घेणार आहे.
माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, मनोगते, स्नेहभोजन व शालेय परिसर भेट असे या मेळाव्याचे स्वरूप आहे. लोकशिक्षण संस्थे अंतर्गत येणाऱ्या विविध आस्थापनेतील माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे व
अधिक माहिती करीता पुढील क्रमांकावर ९७६५९२६४५४
७७९६८६४०७४ संपर्क साधावा,असे आवाहन लोकमान्य माजी विद्यार्थी संस्था, वरोडा यांनी केले आहे.
येथील लोकमान्य कन्या विद्यालयाच्या कार्यालयात आयोजित या पत्रकार परिषदेला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, माजी विद्यार्थी संस्थेचे सचिव अनिल नानोटकर, कोषाध्यक्ष रविंद्र शेंडे, राघवेंद्र अडोणी व महेश पेठकर हे उपस्थित होते
Comments
Post a Comment