शहरात अवैधरित्या पैसे गोळा केल्या प्रकरणात तीन युवकावर गुन्हे दाखल

शहरात अवैधरित्या पैसे गोळा केल्या प्रकरणात तीन युवकावर गुन्हे दाखल

पोलिसांनी वेळीच घेतली दखल.

वरोरा
चेतन लूतडे 

वरोरा शहरात आंबेडकर जयंती निमित्त काही युवकांनी अवैधरित्या वरोरा शहरात व्यापाराकडून पैसे गोळा करून जयंती साठी भले मोठे बॅनर लावण्यात आल्याने पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

 वरोरा शहरातील गांधी बगीचा जवळील चौक, रत्नमाला चौक, बिरसा चौक या ठिकाणी 10X20चे भले मोठे बॅनर उभारण्यात आले होते. ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच या युवकांवर गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

 वरोरा येथे राहणारा व सध्या खुनाच्या गुन्ह्यात चंद्रपूर कारागृहात बंद असलेला देवा नौकरकारचा फोटो असलेले व "देवा ग्रुप वरोरा नाव लिहीलेले बॅनर वरोरा शहराच्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आले होते. त्यामुळे समाजात कोणता आदर्श निर्माण केला जात आहे याचे भान ठेवून पोलिसांनी स्वतः गुन्हा दाखल करून अशा तरुणांना वेळीच आवर घातली आहे.

 बेलवर असलेला सह आरोपी गौरव वाळके , नातेवाईक आर्यन  ह.मु. इंदूबाई नौकरकार यांचे घरी, मित्र चौक वरोरा, व यश नागपुरे रा. स्वामी समर्थ लेआउट  यांनी देवा गुप वरोरा नावाचा ग्रुप तयार करून बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्य  व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करून शहरातील  चौकात देवा नौकरकारचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आहे. 
 मागील महीण्यात "देवा ग्रुप वरोरा" नावाने ग्रुप तयार करून त्याचे कोणतेही रजिस्ट्रेशन न करता वरोरा शहरातून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्त रैली काढत असल्याचे नावावर मार्च 2023 पासून शहरातील विविध ठिकाणाहून व व्यापा-यांकडुन सुद्धा जबरदस्तीने पैसे गोळा केले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून  बॅनर लावणारे तरूण  गौरव वालके,  आर्यन हिवरे यश नागपुरे यांनीच लावलेले असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गौरव वाळके, आर्यन हिवरे यांनी छापलेल्या पावती बुकाबाबत माहीती घेतली असता त्यांनी देवा ग्रुप वरोरा  नावने पावती बुक छापुन त्या मार्फतीने लोकांकडुन व्यापा-यांकडुन *"पावती फाड़ा नाहीतर पुढच्या महीण्यात देवा भाऊची बेल होणारच आहे, तेव्हा पाहुन घेऊ"* अशा प्रकारे दहशत पसरवून त्यांचे कडुन  आर्थीक फायद्याकरीता इच्छा नसताना जबरदस्ती पैसे वसुल करून पावत्या फाडल्याचे दिसुन आले. तसेच ज्यांचे कडुन पावती फाडण्यात आली, त्यांना पावतीबाबत विचारणा केली व पावती मागीतली असता देवा नौकरकार याचे
दहशतीमुळे कोणीही पावती दाखवण्यास व देण्यास तयार झाले नाही. 

 गौरव वाळके, आर्यन हिवरे दोन्ही रा. इंदुबाई नौकरकार यांचे घरी, मित्र चौक, वरोरा व यश नागपुरे रा. स्वामी समर्थ लेआऊट वरोरा यांनी कोणतेही रजिस्ट्रेशन न करता "देवा ग्रुप वरोरा" नावाने पावती बुक छापले व इतर सहका-यांनी देवा नौकरकार याचेबाबत मागील काही महीण्यांपासुन देवाभाऊची बेल होणारच आहे अशी अफवा पसरवून वरोरा शहरात दहशत निर्माण केली व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे निमीत्य साधुन "देवा ग्रुप वरोरा" नावाने पावती बुक छापुन वरो-यातील व्यापारी व नागरीकांकडुन देवा नौकरकार याचे नावाची भिती दाखवुन जबरदस्ती पैसे वसुल करण्यात आल्या प्रकरणात वरोरा पोलिसांनी  गौरव वाळके, आर्यन हिवरे , यश नागपुरे यांचे विरूद्ध कलम 384, 385 भा.द.वि अन्वये  शासनातर्फे कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Comments