वरोरा भद्रावती विधानसभेसाठी भाजपा उमेदवाराची चाचपणी सुरू.
किशोर टोंगे भाजपाच्या वाटेवर?
वरोरा
चेतन लूतडे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वर्ष सुरु झाले असून वरोरा भद्रावती मतदार संघात देखील यासंबधी मोर्चे बांधणी जोरात सुरु आहे.
विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होण्याची शक्यता असून वरोरा मतदार संघ देखील त्याला अपवाद नाही. मात्र सद्यस्थितीत भाजपाकडे मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचे दिसून येत आहे.
त्यादृष्टीने भाजपा वरोरा मतदारसंघात उमेदवाराच्या शोधात असून पक्षात येण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे दिसून येते. मात्र भाजप पक्ष विजयी होऊ शकेल अशा उमेदवाराचा शोध घेत असून त्या संदर्भाने अनेक गुप्त बैठका जिल्हा व राज्य स्तरावर घडून येत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
नुकतेच भाजपच्या महाविजय 2024 च्या संयोजन समितीच्या सदस्या वरोऱ्यात येऊन किशोर टोंगे व शहरातील युवा ग्रुप व इतर अनेक मान्यवर लोकांशी चर्चा करून गेल्याचे समजते.
अल्पावधित वरोरा मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून किशोर टोंगे लोकप्रिय होत असल्याचे दिसून येत असून देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळच्या व प्रदेशाध्यक्ष बावणकुळे यांच्या टीम मधील मानल्या जाणाऱ्या श्वेता शालिनी या किशोर टोंगे व समर्थक यांच्याशी चर्चा करत असेल तर त्यांचा भाजपा प्रवेश होणार आहे का? असं मानायला जागा आहे किंवा भाजपा पक्ष त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे असा त्याचा अर्थ आहे का हे पुढील काळात पाहावे लागेल.
याचबरोबर मनसेचे राजूरकर सुद्धा इच्छुक उमेदवार असून भाजपाची लॉटरी त्यांनाही लागावी अशी त्यांची इच्छा दिसून येते किंवा देवतळे कुटुंबातील सदस्याना भाजपा विधानसभेची तिकीट देऊ शकते. मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जवळचे देवरावजी भोंगळे यांची सुद्धा चर्चा जोरदार सुरू आहे. याव्यतिरिक्त एक- दोन नावे गुप्त ठेवण्यात आलेले आहे.
याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पक्ष राजकारणात मोठ्या नेत्यांना निवडून आणण्यासाठी लहान नेत्याचा बळी दिल्या जातो. त्यामुळे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात कोणता पक्ष बलाढ्य उमेदवार देईल किंवा डमी उमेदवार उभा करेल व अपक्ष उमेदवाराला मदत करून आपल्या पक्षात सामील करेल याचा काही नेम नाही.
त्यामुळे राजकारणातील संभावित उमेदवार फुकून पाऊल टाकत असल्याचे चित्र भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात दिसत आहे.
ज्या पद्धतीने वेगाने घडामोडी घडून येत आहेत यावरून वरोरा मतदार संघात येणाऱ्या काळात काँग्रेस विरुद्ध कोण? या लोकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर लवकरच मतदार संघातील लोकांना दिसून येईल असं वाटतं.
त्यामुळे भाजपाला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये स्थानिक उमेदवार दिला तरच काँग्रेस सोबत लढत होऊ शकेल अशी चर्चा होत आहे.
पंकज नौकरकर यांचे नवीन दुकान शिवाय वडापाव नावाने आज आनंदवन चौक येथे सुरुवात .
Comments
Post a Comment