वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काँग्रेस विरोधात सहा पक्षांनी बांधली वज्रमूठ*

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काँग्रेस विरोधात सहा पक्षांनी बांधली वज्रमूठ

सर्वच पक्षांचे स्नेह मिलन कार्यक्रम आटोपले.

होणाऱ्या निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज
वरोरा 26/4/23
चेतन लूतडे 

वरोरा तालुका प्रतिनिधी- जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराची निवडणूक 28 एप्रिल  तारखेला होऊ घातली असून यात सर्व आघाड्यांना वेगवेगळे चिन्ह मिळाले आहेत. सध्या स्थितीत काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या काँग्रेस विरोधात काँग्रेसने वज्रमूठ बांधण्याएवेजी काँग्रेस विरोधी सहा पक्षानेच वज्रमूठ बांधली असल्याने या निवडणुकीत एक वेगळाच रंग चढला असल्याचे चित्र दिसून येते.
        एकूण 18 जागेसाठी काँग्रेसने संपूर्ण उमेदवार उभे केले आहेत त्यांच्या पॅनल ला छत्री चिन्ह देण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात मनसेचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत टेमुर्डे, काँग्रेसचे डॉ. विजय देवतळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे रवींद्र शिंदे,भाजपचे करण संजय देवतळे व शेतकरी संघटना असे जवळपास सहा पक्ष व संघटना यांनी शेतकरी सहकारी परिवर्तन आघाडी तयार करून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 उमेदवार रिंगणात उतरवले आहे. या पॅनलला कपबशी हे बोधचिन्ह दिलेले आहे.
काँग्रेसचे सहकारी संस्था गटांमध्ये प्रामुख्याने माजी सभापती विशाल बदखल,  प्रमोद मगरे व ग्रामपंचायत गटातून राजेंद्र चिकटे हे उभे आहेत तर शेतकरी सहकार परिवर्तन आघाडी कडून डॉक्टर विजय देवतळे, जयंत टेंभुर्डे, बाळू भोयर, दत्ता बोरीकर हे प्रमुख उमेदवार असून ग्रामपंचायत गटातून विशाल पारखी, ईश्वर पावडे इत्यादी  उमेदवार उभे आहेत.

        यावेळी चिन्ह देण्यासाठी अधिकचा वेळ असल्याने चिन्हे मिळण्यापूर्वी तिन्ही पॅनलने आपापला प्रचार सुरू केला होता. प्रत्येक पॅनल घरोघरी जाऊन उमेदवारांनी प्रत्येक मतदाराची ओळख करून आपल्या पारड्यात मत कसे पडतील याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे चिन्ह जरी उशिरा मिळाली असली तरी मात्र प्रचाराची रणधुमाळी मागील दहा दिवसापासून सुरू आहेत प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने यावेळी बहुतांश मतदार नवीन असून ते कोणत्या तीर्थाटनाला जाईल याचा काही नेम नाही. यावेळी पळवा पळवी संख्या मात्र कमी आहे.त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत येणार असल्याचे चित्र दिसून येते. जवळपास अंदाजे 1550 मतदार असलेल्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांचे स्नेहमिलन कार्यक्रम पार पडले आहे. आता मात्र अवघ्या दोन दिवसात फायनल लढत पाहायला मिळेल. 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील सहकारी संस्था सर्वसाधारण गटामध्ये सात जागेसाठी 22 उमेदवार रिंगणात आहे .महिला गटातून सहा इतर मागासवर्गात 2 व भटक्या विमुक्त जमातीमध्ये 2 यामध्ये सरळ लढत आहे. तसेच ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून पाच उमेदवार, दुर्बल 2 व अनुसूचित जाती जमाती 2 गटात ग्रामपंचायत गटातून हरिष जाधव व विजय नन्नावरे  यांच्यात सरळ लढत आहे.
 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोडे यांनी सुद्धा आपले पॅनल उभे केले असून त्या गटात 18 पैकी दहा उमेदवार रिंगणात असून त्यांचे निवडणूक चिन्ह विमान आहे. त्यांनी या निवडणुकीत उडी घेतली असल्याने  त्यांचा सुद्धा प्रचार जोरात  सुरू आहेत.
शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने एकमेव उमेदवार जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांनी सुद्धा आपली उमेदवारी जाहीर केली असून ते स्वतः एकटेच आपल्या उमेदवारीचा प्रचार करत आहे. नितीन मत्ते यांचा चाहता वर्ग असून त्यांना एक मत दिल्यानंतर बाकीचे मतदान ते गोठवू शकतात त्यामुळे विरोधी पक्षांना याचा चांगलाच फटका बसणार आहे.
वरोरा तालुक्यात जो उमेदवार माढेळी- नागरी क्षेत्रामधून जास्त मताधिक्य घेईल त्याचा विजय निश्चित समजला जातो. 
 या सर्व स्थितीत महाविकास आघाडीला खिंडार पडले असून काँग्रेसने वज्रमूठ बांधण्याएवेजी काँग्रेस विरोधी पक्षानेच वज्रमूठ बांधून सत्तारूढ पक्षांच्या विरोधात लढाई सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे . वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातले आमदार व लोकसभेचे खासदार काँग्रेसचे असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक प्रतिष्ठित ठरणार आहे.
दत्ता बोरेकर वरील अपघात सत्तारूढ गटाच्या पथ्यावर पडेल की काय ही चर्चा सुरू आहे. मात्र पोलिसांनी संपूर्ण तपास करून चालकास ताब्यात घेतल्यानंतर हा अपघात अचानक घडल्याची वार्ता पत्रकारांना दिली.
त्यामुळे या निवडणुकीवर पोलीस यंत्रणेचे लक्ष लागून असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीवर कोणाचे वर्चस्व ठरेल हे लवकरच कळेल.


यावेळेस 2023 साठी  बाजार समिती वर संभावित उमेदवार जाण्याची शक्यता आहे.

सेवा सहकारी संस्था
1)विजय देवतळे
2)बाळू भोयर
3) प्रमोद मगरे
4) राजेश देवतळे (OBC)
5) नितीन मत्ते
6)दत्ता बोरकर/ विशाल बद्दखल
7) साहेबराव ठाकरे/जंयत टेंमूर्डे
8)NT दिलीप ढाले /विलास झिले
9) शरद कारेकर/गजानन कुरेकर
10) महिला:कल्पना टोंगे/सुनंदाताई जीवतोडे
11)महिला: शुभांगी डाखरे/ संगीता उरकांदे/शितल पहापळे
ग्रामपंचायत गट
12) हरीश जाधव/विजय नन्नावरे (Sc/ST)
13) राजू चिकटे/विशाल पारखी
14) गणेश चवले/ प्रमोद फरकाडे
15) पुरुषोत्तम पावडे/ईश्वर पावडे (आ.दू.घ)
व्यापारी गट
16) नीरज गोठी
17) प्रवीण मालू
हमाल गट
18) पांडुरंग झाडे/मोतीराम लोहोकरे

Comments